कोलकाता घटनेवरून सरसंघचालक मोहन भागवत संतापले ; ममता बॅनर्जींना म्हणाले,”त्यांनी या प्रकरणी…”

Mohan Bhagwat On Kolkata Incident । कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवरून राजकीय वातावरण तापले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते या मुद्द्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने करत आहेत. त्याचवेळी तृणमूल काँग्रेसचे नेतेही देशभरातील बलात्काराच्या घटनांचा हवाला देऊन भाजपला कोंडीत पकडत आहेत.
कोलकाता बलात्कार हत्याकांडप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल असे म्हटले आहे. दोन दिवसीय दौऱ्यावर कोलकाता येथे पोहोचलेले मोहन भागवत यांनी, पश्चिम बंगाल सरकारने या जघन्य गुन्ह्याचे दोषी शोधून त्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा द्यावी.” अशी मागणी केली.
काय म्हणाले मोहन भागवत? Mohan Bhagwat On Kolkata Incident ।
बडा बाजारातील एका कार्यक्रमादरम्यान मोहन भागवत यांना आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील घटनेबाबत प्रश्न विचारण्यात आला. या घटनेबाबत समाजातील लोकांच्या भावनांचा आपण पूर्ण आदर करतो, असे ते म्हणाले.
ममता बॅनर्जींना दिला सल्ला Mohan Bhagwat On Kolkata Incident ।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सल्ला दिला. ते म्हणाले, ‘ममता बॅनर्जी यांनी कोलकाता बलात्कार हत्याकांडावर मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली पाहिजे. बंगाल सरकारनेही या घृणास्पद गुन्ह्यातील दोषींना कठोर शिक्षा द्यावी.” असे त्यांनी सांगितले.
सर्व स्तरातून न्यायाची मागणी
कोलकाता बलात्कार हत्याकांडातील न्यायाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. याच क्रमाने रविवारी कोलकाता येथे १५ किलोमीटर लांबीची मानवी साखळी तयार करण्यात आली ज्यामध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. लोकांनी मानवी साखळी करून न्याय मागितला. आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये बलात्कार आणि हत्येला बळी पडलेल्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा या मागणीसाठी श्यामबाजार परिसरातही लोकांनी निदर्शने केली.





