पहलगाम हल्ल्यानंतर संघ ‘ऍक्टिव्ह’ ; मोहन भागवत यांनी घेतली पंतप्रधानांची भेट ; दीड तास दोघांमध्ये चर्चा

Mohan Bhagwat-Modi meeting । पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) सक्रिय झाला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच, संघाने त्यासाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती. संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनीही मुंबई आणि दिल्लीतील सभांमध्ये बदला घेण्याचे आवाहन केले होते. यानंतर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर लगेचच मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी यांची ही सुमारे दीड तास चाललेली बैठक झाली. नेमकं या बैठकीत काय चर्चा झाली हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहेत.
२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच संघ प्रमुख पंतप्रधानांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. समोर आलेल्या माहितीनुसार, संघप्रमुख आणि पंतप्रधान यांच्यात झालेल्या बैठकीत पहलगाम हल्ल्यावर चर्चा झाली. संघ आधीच बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांचा मुद्दा उपस्थित करत आहे आणि आता पहलगाममध्ये धर्माबद्दल विचारल्यानंतर झालेल्या हत्येच्या घटनेमुळे देशभर संताप आहे. मोहन भागवत यांची पंतप्रधानांसोबतची भेटही चर्चेत आहे कारण ते त्यांच्या सभांमध्ये पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याचे आवाहन करत आहेत.
‘अत्याचार करणाऱ्यांना धर्म शिकवणे म्हणजे अहिंसा’ Mohan Bhagwat-Modi meeting ।
पहलगाम हल्ल्यानंतर आतापर्यंत ७८६ पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर पाठवण्यात आले आहे, १६१६ भारतीय परतले आहेत.
मोहन भागवत यांनी मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान म्हटले होते की, ज्या लोकांची हत्या झाली त्यांना त्यांच्या धर्माबद्दल विचारण्यात आले. हा धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष आहे. एक हिंदू हे कधीच करणार नाही. देश मजबूत असला पाहिजे. अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा नाश करावा. दिल्लीतही संघप्रमुखांनी मुंबईत रावणाचा उल्लेख असल्याचे म्हटले होते. रावणाचा वध फक्त त्याच्या कल्याणासाठी झाला. ही हिंसा नाही, ही अहिंसा आहे. आपला धर्म अहिंसा आहे, पण अत्याचार करणाऱ्यांना धर्म शिकवणे म्हणजे अहिंसा. असे भागवत यांनी यावेळी म्हटले.
संघप्रमुखांनी दिल्लीत आम्ही कधीही आमच्या शेजाऱ्यांना इजा करत नाही. यानंतरही जर कोणी चुकीचा मार्ग स्वीकारला तर राजाचे कर्तव्य आहे की तो आपल्या प्रजेचे रक्षण करेल. राजा त्याचे काम करेल.” असे त्यांनी म्हटले. त्या अगोदर, दिल्लीतील दोन दिवसांच्या कार्यक्रमात, आरएसएस नेत्यांनी पहलगाम हल्ल्यावरही चर्चा केली.
संघप्रमुख मोहन भागवत, दत्तात्रेय होसाबळे यांच्यासह संघाचे सर्व सहा संयुक्त सरचिटणीस या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पहलगाम हल्ल्याचा निषेध करताना संघाने म्हटले होते की हा हल्ला देशाच्या एकता आणि अखंडतेवर हल्ला करण्याचा धाडस आहे. आरएसएसचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे यांनी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना तात्काळ शिक्षा करण्याची आणि पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदतीची व्यवस्था करण्याची मागणी केली होती.
दहशतवाद्यांचा काही धर्म असतो Mohan Bhagwat-Modi meeting ।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मार्गदर्शक आणि त्यांच्या संलग्न संघटना मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संरक्षक इंद्रेश कुमार यांनी,”जर दहशतवाद्यांचा कोणताही धर्म नसतो, तर त्यांच्यासाठी अंत्यसंस्कार का केले जातात? लोक त्यांच्या अंत्यसंस्कारांना का उपस्थित राहतात? याचा अर्थ दहशतवाद्यांचा एक धर्म असतो. मुस्लिमांनी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराची प्रार्थना थांबवावी आणि त्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होणे देखील थांबवावे. जर हे पाऊल ३०-४० वर्षांपूर्वी उचलले गेले असते तर जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद झाला नसता. त्यांनी असेही म्हटले होते की आता पाकव्याप्त काश्मीर पुन्हा एकदा परत घेण्याची वेळ आली आहे.
सर्जिकल स्ट्राईक यशस्वी होणार नाही
विश्व हिंदू परिषदेचे (VHP) सरचिटणीस विज्ञानानंद यांनी पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई करण्याची मागणी केली आणि त्याचे पाच तुकडे करावेत असे म्हटले. आता सर्जिकल स्ट्राईक चालणार नाहीत असेही त्यांनी म्हटले. १९७१ मध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे झाले; आता ५० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आरएसएस प्रमुखांनी भारताचे हिंदू राष्ट्र म्हणून केलेले वर्णन संदर्भित करताना, विज्ञानानंद म्हणाले होते की हिंदू जाहीरनाम्यात शत्रूंचा नाश करण्याबद्दल बोलले आहे. जुनी चूक पुन्हा होऊ नये असेही त्यांनी सांगितले.





