Mohan Bhagwat । राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी काशीमधून हिंदू एकतेचे आवाहन केले. मोहन भागवत यांनी यावेळी, स्मशानभूमी, मंदिर आणि पाणी हे सर्व हिंदूंसाठी समान असले पाहिजे. संघ याच उद्देशाने काम करत आहे.” अशी माहिती दिली. जात आणि पंथाचे अडथळे मिटवून सामाजिक एकात्मतेचे आवाहन करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, हिंदू समाजातील सर्व पंथ, जाती आणि समुदायांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे.” असेही त्यांनी यावेळी सांगितले. “संघ हिंदू समाजाच्या बळकटीसाठी काम करते” Mohan Bhagwat । काशीच्या चार दिवसांच्या दौऱ्यात आयआयटी-बीएचयू याठिकाणी आरएसएस राजपुताना शाखेच्या स्वयंसेवकांना संबोधित करताना संघ प्रमुख मोहन भागवत यांनी यावेळी हे आवाहन केले. यावेळी बोलताना त्यांनी,”कोणताही सामाजिक भेदभाव नसावा आणि स्मशानभूमी, मंदिरे आणि पाणी सर्व हिंदूंसाठी समान असले पाहिजे.” असे म्हटले. तसेच भागवत म्हणाले की, “संघ हिंदू समाजाला बळकट आणि एकत्रित करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहे.” भागवत यांनी त्यांच्या चार दिवसांच्या काशी दौऱ्यात, “हिंदू समाजातील सर्व पंथ, जाती आणि समुदायांनी एकत्र यावे हे संघाचे स्वप्न आहे. संघाचे उद्दिष्ट हिंदू समाजाला एकत्र करणे आहे. तसेच गेल्या १०० वर्षांपासून संघ ज्या प्रयत्नांमध्ये गुंतलेला आहे तो सुरूच राहील.” अशी देखील माहिती त्यांनी यावेळी दिली. आपली संस्कृती जपण्यासाठी स्वतः ला पुढाकार घ्यावा लागेल Mohan Bhagwat । पुढे भागवत म्हणाले की, अधिकाधिक तरुणांना संघाशी जोडले जावे लागेल. आपल्याला आपले गट इतके मजबूत बनवावे लागतील की आपले वर्तन पाहून लोक आपल्यात सामील होऊ इच्छितात. तरुणांनी एक तास त्यांच्या विकासासाठी आणि उर्वरित २३ तास समाजाच्या कल्याणासाठी घालवावेत. ते म्हणाले की, संघ तरुणांना योग्य दिशा देण्याच्या आणि इतरांना मदत करण्यासाठी नेहमीच उपलब्ध राहण्याच्या बाजूने आहे.” त्यांनी भारतीय संस्कृती आणि तिच्या नैतिक मूल्यांचा प्रसार करण्याच्या गरजेवरही भर दिला. भागवत म्हणाले की, आपली भाषा, संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी आपल्याला स्वतः पुढाकार घ्यावा लागेल. शनिवारी त्यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉरला भेट दिली आणि भगवान शिव मंदिरात प्रार्थना केली. यानंतर, त्यांनी काशीच्या बुद्धिजीवींशी स्वतंत्र चर्चा केली. आरएसएस प्रमुखांसह विभागाचे सह-सरसंघचालक डॉ. रामेश्वर चौरसिया, क्षेत्र प्रचारक अनिल कुमार आणि राज्य प्रचारक रमेश कुमार हेही उपस्थित होते. याशिवाय, भागवत यांच्या उपस्थितीत काशी क्षेत्रातील संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत, संघटनेच्या शताब्दी वर्षात घरोघरी संपर्क मोहीम, हिंदू परिषदेसह विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली.