Mohammed bin Abdulaziz Al-Khulaifi : इराणबाबत मध्यस्थी करण्यास कतारचा नकार; परराष्ट्र राज्य मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
कतारचे परराष्ट्र राज्य मंत्री मोहम्मद बिन अब्दुलअझिझ अल-खुलायफी (Mohammed bin Abdulaziz Al-Khulaifi) यांनी एक निवेदन प्रसिद्धीस देऊन ही भूमिका स्पष्ट केली आहे.

Mohammed bin Abdulaziz Al-Khulaifi : इराण-अमेरिका, इस्रायल संघर्षामध्ये मध्यस्थी करण्यास कतारने (Mohammed bin Abdulaziz Al-Khulaifi) नकार दिला आहे. इराणकडून कतारवर हल्ले केले जात असताना मध्यस्थी केली जाऊ शकत नाही, असे कतारने म्हटले आहे. कतारचे परराष्ट्र राज्य मंत्री मोहम्मद बिन अब्दुलअझिझ अल-खुलायफी (Mohammed bin Abdulaziz Al-Khulaifi) यांनी एक निवेदन प्रसिद्धीस देऊन ही भूमिका स्पष्ट केली आहे.
इराण आणि पास्चात्यांमध्ये सेतू म्हणून कतार आणि ओमान दोन्ही देशांनी काम केले होते. तरीही कतार आणि ओमानवर इराणने हल्ले केले आहेत. त्यामुळे हल्ले होत असताना आम्ही मध्यस्थीची भूमिका निभावू शकणार नाही. ही बाब इराणने समजून घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान इराणकडून आणखी हल्ले केले जाण्याची शक्यता असल्याचा इशारा कतारने जनतेला दिला आहे. कतारची राजधानी दोहाच्या दिशेने इराणी क्षेपणास्त्रे कतारच्या हवाई संरक्षण प्रणालीने हवेतच रोखल्याने मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू येत होते.
दरम्यान इराणविरोधातल्या कारवाईसाठी रोमानियातल्या तळावर अमेरिकेचे अधिक सैनिक तैनात करू देण्याबाबतची अमेरिकेची विनंती रोमानियाने मान्य केली आहे. याशिवाय रोमानियाच्या हवाई तळांचा वापर करू देण्याची मागणीही रोमानियाने मान्य केली आहे. राष्ट्रीय संरक्षण सर्वोच्च परिषदेच्या बैठकीनंतर रोमानियाचे अध्यक्ष निकुसर डॅन यांनी ही माहिती दिली.





