Mohammad Safa: इराणवर अणुबॉम्ब टाकला जाणार? ; UN च्या अधिकाऱ्याचे गंभीर आरोप ; १२ वर्षांची कारकीर्द लावली पणाला
Mohammad Safa: युद्धाच्या घडामोडीत संयुक्त राष्ट्रांचे राजनयिक आणि पॅट्रिऑटिक व्हिजन असोसिएशनचे संयुक्त राष्ट्रांमधील दीर्घकाळ प्रतिनिधी असलेल्या मोहम्मद सफा यांनी युद्धासंदर्भात एक गंभीर आरोप केला आहे.

Mohammad Safa: मध्य पूर्वेत सुरु झालेल्या युद्धाला आता महिना होऊन गेला आहे मात्र यातून कोणत्याही देशाने तोडगा काढलेला दिसत नाहीत. ड्रोन्स, क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर आता थेट जमिनीवरील युद्ध सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, या युद्धाच्या घडामोडीत संयुक्त राष्ट्रांचे राजनयिक आणि पॅट्रिऑटिक व्हिजन असोसिएशनचे संयुक्त राष्ट्रांमधील दीर्घकाळ प्रतिनिधी असलेल्या मोहम्मद सफा यांनी युद्धासंदर्भात एक गंभीर आरोप केला आहे.
संयुक्त राष्ट्रे इराणमध्ये अण्वस्त्रांच्या संभाव्य वापराची तयारी करत असल्याचा आरोप मोहम्मद सफा यांनी केला. तसेच आपल्या दीर्घकाळच्या संयुक्त राष्ट्रातील पदाचा राजीनामा दिला आहे. Mohammad Safa
मोहम्मद सफा जवळपास १२ वर्षे संयुक्त राष्ट्रांमध्ये पीव्हीएचे मुख्य प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. त्यांनी सोशल मीडियावर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे. याविषयी त्यांनी आपल्या पोस्टमध्ये, “संयुक्त राष्ट्रे इराणमध्ये संभाव्य अण्वस्त्र वापराची तयारी करत असताना आपण याचे साक्षीदार होऊ इच्छित नाही”, असे म्हटले आहे.
मोहम्मद सफा यांनी इराणची राजधानी तेहरानचा एक फोटो एक्सवर शेअर करत, “लोकांना अजूनही याचे गांभीर्य कळलेले नाही. हा तेहरानचा फोटो आहे. तुमच्यासारख्या अशिक्षित, कधीही प्रवास न केलेल्या, सैन्यात सेवा न दिलेल्या आणि बॉम्ब फेकण्याच्या विचाराने तोंडाला पाणी सुटणाऱ्या लोकांसाठी हे शेअर करत आहे.” असे म्हटले आहे. Mohammad Safa
पुढे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये, “तेहरान काही कमी लोकसंख्येचे शहर नाही. इथे असंख्य कुटुंबे, मुले, पाळीव प्राणी आहेत. स्वप्न पाहणारी सामान्य कष्टकरी लोक आहेत. मात्र तुम्हाला विकृत युद्धज्वर आहे.
तेहरान जवळपास १ कोटी लोकसंख्येचे शहर आहे. तुम्ही वॉशिंग्टन, बर्लिन, पॅरिस, लंडन किंवा इतर शहरांवर अणुबॉम्ब टाकण्याची कल्पना करून बघा”, अशी उद्विग्नता व्यक्त केली आहे.
I don’t think people understand the gravity of the situation as the UN is preparing for possible nuclear weapon use in Iran.
This is a picture of Tehran. For you uneducated, untraveled, never-served, warhawks licking your chops at the thought of bombing it. It’s not some low… pic.twitter.com/BnzB4F3001
— Mohamad Safa (@mhdksafa) March 29, 2026
मोहम्मद सफा यांनी, इराणवरील संभाव्य अणुहल्ल्याची माहिती उघड करण्यासाठी मी माझी राजनयिक कारकीर्द पणाला लावत आहे. अणू युद्धाचा काळ टाळण्यासाठी खूप उशीर होऊ नये आणि मानवतेविरोधातील या गुन्ह्याचा साक्षीदार होऊ नये म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.” असे स्पष्टीकरणही दिले आहे.
जगाला सतर्कतेचा इशारा Mohammad Safa
मोहम्मद सफा यांनी राजीनामा देत असताना जगाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. अण्वस्त्रांच्या वापराची शक्यता अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. हे अतिशय धोकादायक असून आताच कृती करण्याची आवश्यकता आहे.
हा संदेश जगभरात पसरवा, रस्त्यावर उतरा, मानवता आणि मानवतेच्या भविष्यासाठी निदर्शने करा. फक्त लोकच आता हे थांबवू शकतात. तरच इतिहास आपल्याला लक्षात ठेवेल, असे कळकळीचे आवाहन मोहम्मद सफा यांनी केले.






