Mohammad Azharuddin : ‘क्रिकेट खेळल्याची खंत…’, स्टेडियमच्या स्टँडवरून नाव हटवल्याने अझरुद्दीन संतप्त

Mohammad Azharuddin Slams HCA for Removing His Name : हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमच्या स्टँडवरुन मोहम्मद अझरुद्दीनचे नाव काढून टाकण्यात आले आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या या निर्णयानंतर माजी भारतीय कर्णधाराचे मन दुखावले आहे. अझरुद्दीनने हे कृत्य अत्यंत लज्जास्पद म्हटले आणि बीसीसीआयकडून कारवाईची मागणी केली. अझरुद्दीन इतका निराश झाला आहे की त्याने क्रिकेट खेळल्याचा पश्चात्ताप झाल्याचेही म्हटले आहे. अझरुद्दीनने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे.
क्रिकेट खेळलो याचा मला पश्चात्ताप – मोहम्मद अझरुद्दीन
गल्फ न्यूजशी माजी भारतीय कर्णधार म्हणाला की, “मला हे सांगताना खूप वाईट वाटत आहे. कधीकधी मला क्रिकेट खेळल्याचा पश्चात्ताप होतो. आज खेळाशी संबंधित निर्णय असे लोक घेत आहेत, ज्यांना क्रिकेटची मूलभूत समजही नाही. हा खेळाचा अपमान आहे. मी या अन्यायाविरुद्ध कायदेशीर कारवाई करेन आणि बीसीसीआयला या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याचे आवाहन करेन. तथापि, हे एकच वेगळे प्रकरण नाही. सनरायझर्स हैदराबादसोबत पासबाबतही वाद झाला होता, यावरून असे दिसून येते की या संघटनेच्या व्यवस्थापनात मोठी कमतरता आहे, ज्यामुळे अशा परिस्थिती उद्भवत आहेत.”
🚨Former India skipper Mohammad Azharuddin has said that he will move to the High Court to challenge the Ombudsman’s order to remove his name from the North Stand of Rajiv Gandhi stadium in Hyderabad 🚨
(PTI)#IPL #IPL2025 pic.twitter.com/wFZXYVW3zb
— Cricketism (@MidnightMusinng) April 21, 2025
एचसीएने अझहरचे नाव स्टँडवरुन का काढून टाकले?
🚨 AZHARUDDIN STAND REMOVAL. 🚨
– The HCA has been ordered to remove Mohammad Azharuddin’s name from the North Pavilion stand at the Uppal Stadium. No tickets will be printed with the name of Azharuddin as well. (Cricbuzz). pic.twitter.com/khmZua1bbt
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 20, 2025
एचसीएचे अथिक्स ऑफिसर आणि लोकपाल न्यायमूर्ती व्ही. ईश्वरय्या यांनी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला नॉर्थ पॅव्हेलियन स्टँडवरून मोहम्मद अझरुद्दीनचे नाव काढून टाकण्याचे निर्देश दिले. अझरुद्दीनवर पक्षपाताचे गंभीर आरोप करणाऱ्या याचिकेनंतर शनिवारी हा आदेश देण्यात आला. क्रिकबझच्या वृत्तानुसार, लॉर्ड्स क्रिकेट क्लबच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. या याचिकेत असा आरोप करण्यात आला होता की एचसीए अध्यक्ष म्हणून अझरुद्दीनने आपल्या पदाचा गैरवापर केला आणि त्याचे निर्णय त्याच्या वैयक्तिक फायद्यासाठी होते.
हेही वाचा – Rohit Sharma : ‘मला वानखेडेमध्ये प्रवेश दिला जात नव्हता, पण आज…’, विजयानंतर हिटमॅन झाला भावुक
मोहम्मद अझरुद्दीनची क्रिकेट कारकिर्द –
मोहम्मद अझरुद्दीनने भारतासाठी ९९ कसोटी सामन्यांमध्ये २२ शतकांसह ६२१५ धावा केल्या. याशिवाय, त्याने ३३४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३६ पेक्षा जास्त सरासरीने ९३७८ धावा केल्या. ज्यामध्ये ७ शतकांचा समावेश होता. अझहरने त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत एकूण ५४ शतके ठोकली आणि त्याने लिस्ट ए मध्ये ११ शतके ठोकली.





