महत्त्वाच्या मुद्द्यांकडे मोदींचे दुर्लक्ष- नवज्योतसिंग सिध्दू
Updated On:

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते नवज्योतसिंग सिध्दू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 2014 मध्ये गंगा स्वच्छ करण्याचे आश्वासन देऊन मोदी सत्तेत आले, परंतु 2019ला राफेलमधील घोटाळ्यामुळे त्यांना सत्तेबाहेर जावे लागणार आहे. गंगा स्वच्छतेवरून सिद्धू यांनी मोदींवर प्रहार केला आहे. मोदींनी केलेला गंगा स्वच्छतेचा दावा फार खोटा ठरला आहे, गंगा आमची ओळख आहे. ओळखच हरवली तर कुठे जाणार, असा प्रश्नही सिद्धू यांनी उपस्थित केला आहे.
डिजिटल इंडियाअंतर्गत ब्रॉड बॅंड कनेक्टिव्हिटी अडीच लाख गावांत जाणार होती, पण फक्त 1 लाख 10 हजार गावांपर्यंत फक् त केबल पोहोचली आहे, मोदींनी ग्रामपंचायतीपर्यंत इंटरनेट घेऊन जाणार असल्याची दिलेली सर्व आश्वासने फोल ठरली आहेत.





