मोदींच्या सभेत काळ्या कपड्यांवर बंदी; बनियनही काढण्यास सांगितले
Updated On:

नगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अहमदनगरला जाहीर सभा होत आहे. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव काळ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही काळे कपडे घातलेल्या व्यक्तीस सभेत प्रवेश नाकारण्यात येत आहे. अन्यथा त्यांना ते कपडे उतरविण्यास सांगण्यात येत आहे. अनेक लोक काळे बनियान आणि मोजे घालून सभेत आले होते.
दरम्यान, युतीचे उमेदवार डॅा. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी येथे सभा घेत आहेत.





