J. P. Nadda : “देशावर आलेले संकट निवारण्यासाठी आणि….”; जे. पी. नड्डाचं गणपती बाप्पाला साकडं

पुणे : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर जे. पी. नड्डा यांनी प्रसाराध्यमांशी सवांद साधला. यावेळी जे. पी. नड्डा म्हणाले ककी, काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सगळा देश हादरून गेला आहे. देशावर आलेले संकट निवारणासाठी गणपती बाप्पाला आम्ही साकडे घातले असे, जे. पी. नड्डा म्हणाले.
नेमकं काय म्हणाले जे. पी. नड्डा ? दोषी
जे. पी. नड्डा म्हणाले की, दगडूशेठ गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी मी येथे आलो आहे. देशावर आलेले संकट निवारणासाठी पुण्यातील दगडूशेठ गणपतीला साकडे घातले. तसेच आशीर्वाद मिळवण्यासाठी गणपतीचे दर्शन घेतले, असं जे. पी. नड्डा म्हणाले.
पुढे म्हणाले, काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सगळा देश हादरून गेला आहे. जमू काश्मीर पहलगाम येथे ज्याप्रकारे आतंकवादी हल्ला करण्यात आला. त्याच प्रकारे दोशी असणाऱ्यांना उत्तर दिलं जाईल. यासाठी गणपती बाप्पाचे आशीर्वाद मिळतील, असं जे. पी. नड्डा यांनी यावेळी सांगितलं.
देश मजबुतीने पुढे जाऊन भारतीय संकटातून बाहेर येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात याला उत्तर दिले जाईल. यासाठी नरेंद्र मोदीजींना गणपती बाप्पाने ताकद द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच पहलगाम हल्ला झाला त्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत, असंही जे. पी. नड्डा यावेळी म्हणाले.





