विद्यार्थी आंदोलनामध्ये काँग्रेसह, नक्षलवाद्यांचा हात- मोदी
Updated On:

रांची : विद्यार्थी आंदोलनामध्ये काँग्रेसह शहरी नक्षलवाद्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. झारखंडमधील बरहैट येथे प्रचारसभेत ते बोलत होते.
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभरात हिंसाचार होत आहे. पोलिसांत विद्यार्थ्यांमध्ये धुमश्चक्री होत आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे काँग्रेससह इतर लोकांचा हात आहे.
विरोधक नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन राजकारण करीत आहे. जनतेचे सरकार आहे. तुमचे मुद्दे आमच्यासमोर मांडा आम्ही तुमच्यासोबत चर्चा करू असेही मोदी म्हणाले.





