Modi government । Murlidhar Mohol – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी मंत्रिपदांची विभागणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ मंत्र्यांना मागच्या वेळेप्रमाणेच स्थान देण्यात आले आहे. अमित शहा गृहमंत्री तर ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह हे संरक्षण मंत्री राहतील. याशिवाय नितीन गडकरी रस्ते वाहतूक मंत्री असतील. अजय टमटा आणि हर्ष मल्होत्रा दोघे रस्ते वाहतूक राज्यमंत्री असतील. नितीन गडकरी हे त्यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात रस्ते वाहतूक मंत्री म्हणून प्रसिद्ध आहेत. तर एस जयशंकर यांना परराष्ट्र मंत्रीपद देण्यात आलं आहे. तर दुसरीकडे पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेले मुरलीधर मोहोळ यांना नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाची जबादारी देण्यात आली आहे. दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांनी भाजपचा कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला होता. त्यानंतर पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्याने त्यांना ही संधी मिळाली आहे.