मोदी सरकार जनतेचे बजेट बिघडवतेय-कॉंग्रेस

नवी दिल्ली – कॉंग्रेसने गॅस सिलिंडर दरवाढीवरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. असंवेदनशील सरकार जनतेचे बजेट बिघडवत असल्याचे त्या पक्षाने म्हटले.
कॉंग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी येथे पत्रकार परिषद घेऊन जनसामान्यांना दिलासा देण्यासाठी सिलिंडर दरात कपात करण्याची मागणी केली. दरवाढीचा निषेध करण्यासाठी त्यांनी बरोबर रिकामा सिलिंडर आणि चूल आणली.
LIVE: Special Congress Party Briefing by Smt. @SupriyaShrinate, Ms. @LambaAlka, Ms. @Radhika_Khera & Ms. @AmritaDhawan1 at the AICC HQ.#भाजपाई_हैं_तो_महंगाई_है
— Congress (@INCIndia) August 18, 2021
गॅसचे दर ठरवणाऱ्या परदेशी कंपन्यांच्या म्हणण्यानुसार खरा दर 600 रूपयेच आहे. मग, देशातील जनतेला 260 रूपये अधिक का मोजावे लागत आहेत? सध्याच्या आर्थिक पेचाच्या स्थितीत अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत.
तर, अनेकांचे वेतन कमी झाले आहे. त्यांच्या घरांचे बजेट कोलमडू न देण्याची जाणीव सरकारला केव्हा होणार, असे सवाल त्यांनी केले.
दिल्ली कॉंग्रेसच्या अध्यक्षा अमृता धवन यांनी तर दरवाढ रोखता येत नसेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

