मोदी सरकारमध्ये सचिव स्तरावर मोठे फेरबदल, आरके सिंग नवे संरक्षण सचिव

RK Singh new Defense Secretary – स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्याच दिवशी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सचिव स्तरावर मोठे फेरबदल केले आहेत. केंद्र सरकारने आरके सिंग यांची नवे संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. देशाचे विद्यमान संरक्षण सचिव अरमानी गिरधर यांच्या निवृत्तीनंतर 31 ऑक्टोबर रोजी आरके सिंग देशाचे नवे संरक्षण सचिव म्हणून पदभार स्वीकारतील. तर, के. श्रीनिवास यांना गृहनिर्माण आणि शहरी सचिव बनवण्यात आले आहे. विवेक जोशी यांच्याकडे कार्मिक सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय अनेक नवीन अधिकाऱ्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल झाले आहेत.
दीप्ती उमाशंकर राष्ट्रपतींच्या सचिव –
मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत सुमारे 20 सचिवांचे विभाग बदलण्यात आले आहेत. पुण्य सलील श्रीवास्तव यांच्याकडे नवीन आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर दीप्ती उमाशंकर राष्ट्रपतींच्या सचिव बनल्या आहेत. नागराजू मदिराला यांची आर्थिक सेवा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
संरक्षण मंत्रालयातही फेरबदल –
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने राजेश कुमार सिंग यांची संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण विभागातील विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून नियुक्तीला मान्यता दिली आहे. याशिवाय, नियुक्ती समितीने संजीव कुमार यांची संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे.
नीलम शम्मी राव अल्पसंख्याक आयोगाच्या सचिव –
IAS मनोज गोविल यांना अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागात सचिव करण्यात आले आहे. IAS वंदना गुरनानी यांची कॅबिनेट सचिवालयाच्या सचिव (समन्वय) नियुक्ती करण्यात आली आहे. IAS नीलम शम्मी राव यांची राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय आयएएस दीप्ती गौर मुखर्जी यांची कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढे बघा कोणत्या अधिकाऱ्यांच्या खात्यात फेरबदल करण्यात आले आहेत.





