बीड जिल्ह्यातील गावकऱ्यांचे आदर्श काम; जि.प. शाळेचा केला कायापालट

बीड – आपल्या मुलांचे चांगले भविष्य सुनिश्चित करण्यासाठी, महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एका गावातील रहिवाशांनी जिल्हा परिषद शाळेची स्थिती सुधारण्यासाठी स्वताच पैसा आणि जमीन मिळवून या शाळेची सुधारणा करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी सरकारी निधीची वाट न पाहण्याचा स्त्युत निर्णय घेतला आहे. यातून आता तेथे सुसज्ज शाळा व मैदान उपलब्ध होणार आहे.
औरंगाबाद शहरापासून सुमारे 160 किलोमीटर अंतरावर असलेल्या पोखरी गावातील रहिवाशांनी हे काम केले आहे. त्यासाठी त्यांनी आतापर्यंत क्राउडफंडिंगद्वारे 39 लाख रुपये जमा केले आहेत. गावातल्याच चार जणांनी शाळेच्या विस्तारासाठी एक एकरपेक्षा जास्त जमीन दान केली आहे. या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतची मुले शिकतात.
2018 मध्ये गावकऱ्यांनी स्वकष्टातून आणि स्वताच्या आर्थिक योगदानातून या शाळेच्या सुधारणेचे काम हाती घेतले. परंतु या कामाला 2020 मध्ये करोनामुळे अडथळे आले. पण आता मात्र त्यांनी पुन्हा जोमाने हे काम हाती घेतले असून परंतु पुढील शैक्षणिक वर्षात ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. या गावात सुमारे 1,300 लोक राहतात आणि त्यापैकी बहुतेक शेतकरी आणि ऊस कामगार आहेत.
पीटीआयशी बोलताना राम फलके या रहिवाशांपैकी सांगितले की, गावात जिल्हा परिषद संचालित शाळा आहे, जिथे स्थानिक मुले शिकतात. त्यात चार वर्गखोल्या आहेत आणि त्यापैकी दोन खोल्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे त्यामुळे त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची गरज आहे. सरकारी यंत्रणांनी दुरुस्तीच्या कामासाठी काही निधी दिला असला तरी तो पुरेसा नव्हता. शाळेलाही जागेची टंचाई होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी गावकऱ्यांनी शाळेची नवीन इमारत बांधण्याची चळवळ हाती घेतली असे ते म्हणाले.
चार ग्रामस्थ पुढे आले आणि त्यांनी 2018 मध्ये या कामासाठी एक एकरपेक्षा जास्त जमीन दान केली असे यांनी फलके सांगितले. ते पुढे म्हणाले की, ग्रामस्थांनी सुरुवातीला लोकांकडून देणगीद्वारे 18 लाख रुपये उभे केले. पण ती रक्कम पुरेशी नव्हती. पण कोविड-19-संबंधित प्रतिबंध हटवल्यानंतर, अधिक निधी गोळा करण्यात आला. आतापर्यंत जमा झालेली एकूण रक्कम 39 लाख रुपये आहे.





