Dhananjay Munde : काही दिवसांपूर्वी माजी मंत्री धनजंय मुंडे इगतपुरी येथे विपश्यनेसाठी गेले होते. याच काळात त्यांच्या डोळ्यांचेही अॅापरेशन झाले. विपश्यना पूर्ण झाल्यानंतर धनंजय मुंडे सोमावारी बीडमध्ये परतले आहेत. त्यांनी सर्वप्रथम माजलगावचे दिवंगत आमदार आर. टी. देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना धीर दिला. धनंजय मुंडे यांनी आर.टी. देशमुख यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेला वंदन केले. यानंतर त्यांनी आर. टी. देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांची विचारपूस आणि सांत्वन केले. धनंजय मुंडे यांनी आर. टी. देशमुख यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना आलिंगन देऊन त्यांचे सांत्वन केले. काही दिवसांपूर्वी लातूर येथील अपघातात आर.टी. देशमुख यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मुंडे यांनी कुटुंबीयांना भेट देत त्यांचे सांत्वन केले. राज्यात मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने तीव्र संतापाची लाट उसळून आली होती. या प्रकरणात अनेक धक्कादायक आणि मन्न सुन्न करणाऱ्या घटना समोर आल्या होत्या. या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याचे आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग आढळून आला होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाच्या खुर्चीवरून पायउतार होत पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांना बेल्स पाल्सी नावाचा आजार झाला होता. त्यामुळे ते अज्ञातवासात निघून गेले होते. आज सुनावणीत काय होणार? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात आज सुनावणी पार पडणार आहे. विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम हे कामकाज बघणार आहेत. बचाव पक्षाकडून त्यांचे म्हणणे मांडण्यात येणार आहे. यामुळे आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा: राजकारणातून टोप्या लुप्त झाल्या: सुशीलकुमार शिंदे यांचे विधान; बदलेल्या राजकीय सामाजिक परिस्थितीवर भाष्य करत म्हणाले…