मनसेचे पुण्यात दोन दिवस ‘आत्मचिंतन’; अध्यक्ष राज ठाकरे साधणार पराभूत उमेदवारांशी संवाद

Updated On:
मनसेचे पुण्यात दोन दिवस ‘आत्मचिंतन’; अध्यक्ष राज ठाकरे साधणार पराभूत उमेदवारांशी संवाद

पुणे – विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. तर पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत काही उमेदवार निवडून येण्याची अपेक्षा पक्षाला होती. आता पक्षाध्यक्ष राज ठाकरे मुंबई-ठाण्यापाठोपाठ पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रातील पराभूत उमेदवार, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

पक्षाची पुढील भूमिका काय असावी, या बाबतही चर्चा होणार आहे. शहर पदाधिकाऱ्यांकडून या बैठकीचे नियोजन करण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बुधवारी आणि गुरूवारी पुण्यात असून गुरूवारी ही बैठक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लोकसभेला भाजपला जाहीर पाठींबा दिलेल्या मनसेकडून विधानसभा निवडणुकीत मात्र पुण्यात कोथरूड, खडकवासला, हडपसर आणि कसबा मतदारसंघात उमेदवार उभे केले होते.

मात्र, या सर्व ठिकाणी मनसेच्या उमेदवारांना पराभवाचा समाना करावा लागला आहे. काही मतदारसंघांत चांगली मते मिळाली आहेत. त्यातच आता राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकांच्या पराभवाची कारणे लक्षात घेऊन पक्षाची पुढील दिशा ठरविण्यासाठी राज ठाकरे सर्व उमेदवार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Raj Thackeray : फोडाफोडीच्या राजकारणावरून राज ठाकरेंचा संताप; म्हणाले...

2026-06-20 17:51:05

Raj Thackeray : फोडाफोडीच्या राजकारणावरून राज ठाकरेंचा संताप; म्हणाले...

Raj Thackeray : "तुमच्या मताची किंमत शून्य झालीये"; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा संताप

2026-06-20 12:41:32

Raj Thackeray : "तुमच्या मताची किंमत शून्य झालीये"; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा संताप

Raj Thackeray-Uddhav Thackeray : त्यांना सरळ तुडवून सरळ करा.! ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचे आवाहन; मुंबईत झळकले होर्डिंग

2026-06-19 16:18:05

Raj Thackeray-Uddhav Thackeray : त्यांना सरळ तुडवून सरळ करा.! ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचे आवाहन; मुंबईत झळकले होर्डिंग

Raj Thackeray : राजकीय घडामोडींना वेग; सहा खासदारांच्या बंडानंतर राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, घेतला मोठा निर्णय

2026-06-18 14:38:38

Raj Thackeray : राजकीय घडामोडींना वेग; सहा खासदारांच्या बंडानंतर राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, घेतला मोठा निर्णय

Tejaswini Pandit Raj Thackeray Birthday Post: ‘तुमच्यासाठी राज ठाकरे नाव असेल, पण आमच्यासाठी'... तेजस्विनी पंडितच्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा

2026-06-15 11:33:58

Tejaswini Pandit Raj Thackeray Birthday Post: ‘तुमच्यासाठी राज ठाकरे नाव असेल, पण आमच्यासाठी'... तेजस्विनी पंडितच्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा