“राज ठाकरेंचा बांध फुटला अन् बाळासाहेबांचा ‘राजा’…”; काका-पुतण्याच्या नात्याविषयीची मनसेची पोस्ट

MNS post। राज्यात सध्या काका-पुतण्याची चर्चा जोरदारपणे सुरु आहे. जयंत पाटील यांच्या काका-पुतणे हे काँग्रेसला धार्जिण आहेत या वाक्यावरून या चर्चांना उधाण आलंय. आता त्यांच्या याच विधानाचा आधार घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एक खास पोस्ट शेअर करण्यात आलीय. ज्यामध्ये काका-पुतण्याच्या नात्याविषयी सांगण्यात आलं आहे.
मनसेने शेअर केलेल्या पोस्टमध्ये,“आज महाराष्ट्रात राजकीय कुटुंबातील काका – पुतण्या या नात्यावर अनेक जण व्यक्त होत आहेत. कुणी आपल्या काकांचं वय काढतोय, उर्मट बोलतोय तर कुणी काकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना गहिवरतो आहे,” अशी खोचक टीका करण्यात आलीय.
काका – पुतण्याचं निस्सीम प्रेम महाराष्ट्राने अनुभवलं MNS post।
पुढे या पोस्टमध्ये “पण अशाच एका काका – पुतण्याचं निस्सीम प्रेम महाराष्ट्राने अनुभवलं आहे. ती दृश्य आजही महाराष्ट्राला स्तब्ध करतात. २०१२ साली बाळासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी दिला जाणार होता. बराच काळ धीरगंभीर होऊन अंत्यसंस्कार पाहणाऱ्या राज ठाकरे यांचा बांध फुटला आणि बाळासाहेबांचा ‘राजा’ ढसाढसा रडला. आजही ते क्षण आठवले की, गहिवरुन येतं, हेच खरे मराठी संस्कार”, असे म्हटले आहे.
मनसेच्या अधिकृत खात्यावरून ही पोस्ट शेअर करताना दोन फोटोही पोस्ट करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारावेळचे हे फोटो असून यामध्ये राज ठाकरे भावूक झालेले स्पष्ट दिसत आहेत. परंतु, मनसेने काही वेळापूर्वी केलेली ही पोस्ट आता डिलिट करण्यात आलीय.
जयंत पाटील म्हणाले,… MNS post।
“काँग्रेसचं बरं आहे काका-पुतण्याचं नातं धार्जिणं दिसत आहे. दिलीप देशमुख उत्तमपणाने नेतृत्त्व करत आहेत. अमित यांच्यासह सर्वांचे संबंध मधूर आहेत. राजकारणात कसंही कोणी वागलं तरी चालतं. पण राजकारणासाठी व्यक्तिगत नातं तोडण्याची भूमिका कोणी घेता कामा नये. आता त्याही गोष्टी व्हायला लागल्या आहेत”, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी लगावला.





