बृजभूषण यांचा खुलासा
\nहा फोटो आल्यानंतर बृजभूषण यांनी या प्रकरणी आपले म्हणणे मांडले आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत. मी कुस्तीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, तर शरद पवार हे पदाधिकारी आणि संरक्षक आहेत. तीन वर्षांपूर्वीचा हा फोटो असून कुस्तीच्या क्षेत्रात माझ्यामुळे चांगले काम झाल्याची पवार यांची भावना असल्याचे त्यांनी नमूद केले. पवार यांच्याशी चांगले संबंध असल्याचा आपल्याला अभिमान असून ते अयोध्येत आले तर आपण त्यांना प्रणाम करू असेही त्यांनी म्हटले आहे.