कुणाल कामराचे मनसे नेत्याने मानले आभार; ‘त्या’ गाण्याचा शेअर केला व्हिडिओ

Raju Patil Reacts on Kunal Kamra | स्टँडअप कॉमेडिन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका विडंबनात्मक काव्याच्या माध्यमातून खिल्ली उडवली होती. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता. कुणाल कामरा देखील आपल्या भूमिकेवर ठाम असून माफी मागणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. सत्ताधारी कुणाल कामरावर भडकले असले तरी विरोधकांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे.
यावर अनेक राजकीय प्रतिक्रियाही समोर येत आहे. यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू पाटील यांनीही एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर कुणाल कामराचा एक व्हिडीओ शेअर करत त्याचे आभार मानले आहेत.
राजू पाटील यांची पोस्ट
या व्हिडीओमध्ये त्याने राज्यातील मेट्रोची काम, रस्त्यांची दुर्दशा या मुद्यांवरून सरकारला टार्गेट केलं आहे. यावर राजू पाटील यांनी “धन्यवाद, कुणाल कामरा… आम्हा डोंबिवलीकरांच्या व्यथा मांडल्याबद्दल” असं म्हटलं आहे. बिल्डरांची मेट्रो, MMRDA, MSRDC, टक्केवारी, kunal kamra हे हॅशटॅग देखील वापरले आहेत. राजू पाटील यांच्या पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. Raju Patil Reacts on Kunal Kamra |
धन्यवाद @kunalkamra88 , आम्हा डोंबिवलीकरांच्या व्यथा मांडल्याबद्दल ! #बिल्डरांची_मेट्रॅा #MMRDA #MSRDC #टक्केवारी #kunal_kamra pic.twitter.com/R7smgHaymm
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) March 26, 2025
शिवसैनिकांकडून शोच्या सेटची तोडफोड
कॉमेडियन कुणाल कामराने शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावर गाणे गायले होते. या गाण्याच्या बोलवरुन शिवसैनिक संतापले. त्यानंतर शिवसैनिकांनी हा शो जिथे झाला त्या हॉटेलमध्ये जाऊन शोच्या सेटची तोडफोड केली होती. तसेच शिवसैनिकांनी कॉमेडियन कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
कुणाल कामराला दुसऱ्यांदा समन्स
एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत रचणारा स्टैंड अप कॉमेडियन कुणाल कामरा याला पोलिसांनी दुसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. कामराने चौकशीला उपस्थित राहण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी मागितला होता. परंतु पोलिसांनी त्याची मागणी फेटाळून लावली आहे. मुंबई पोलिसांनी कुणालला मंगळवारी पहिली नोटीस पाठवली होती. Raju Patil Reacts on Kunal Kamra |
हेही वाचा:
Walmik Karad : ऑफिस बॉयचा जबाब अन् वाल्मिक कराडचा टप्प्यात कार्यक्रम; सगळंच काढलं बाहेर…





