MNS News : मनसेला मोठा धक्का! दिग्गज नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
MNS News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाशिक जिल्ह्यात मोठा आणि अत्यंत धक्कादायक धक्का बसला आहे.

MNS News : नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे कळवण तालुकाध्यक्ष आणि माजी सैनिक शशिकांत दादाजी पाटील (वय 62) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कळवण शहरासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. (MNS News)
मिळालेल्या माहितीनुसार, शशिकांत पाटील यांच्यावर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी (15 जून) सायंकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (MNS News)
मनसेची पक्षबांधणी करण्यात महत्त्वाची भूमिका
भारतीय सैन्यात सेवा बजावल्यानंतर निवृत्त झालेल्या शशिकांत पाटील यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी पक्षात प्रवेश केला आणि संघटन कौशल्याच्या जोरावर कळवण तालुक्यात मनसेची मजबूत पक्षबांधणी केली. (MNS News)
सामाजिक कार्यातही सक्रिय
राजकीय कामासोबतच त्यांनी ‘राजगर्जना मित्र मंडळ’ या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले. त्यामुळे त्यांचा समाजाशी कायम जवळचा संपर्क राहिला आणि सर्वसामान्यांमध्ये त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. (MNS News)![]()
आज होणार अंत्यसंस्कार
शशिकांत पाटील यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. जतीन आणि अजय पाटील यांचे ते वडील होते. मंगळवारी (16 जून) सकाळी 10 वाजता कळवण येथील गिरणा संगम अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (MNS News)
त्यांच्या निधनाबद्दल मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त केला जात आहे. (MNS News)





