राज ठाकरेंचा पुन्हा ‘ लाव रे तो व्हिडिओ’, सभेत दाखवल गंगेच्या प्रदुषणाचं भयानक वास्तव; म्हणाले, ‘कोणी मला हिंदुत्व शिकवू नये’

Raj Thackeray Speech | गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजी पार्कवर सभा पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी केली. गंगा नदीच्या प्रदुषणापासून ते औरंगाजेबच्या कबरीपर्यंत, राज ठाकरेंनी विविध मुद्यांवर भाष्य केले.
काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी गंगा नदीच्या प्रदुषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. या टीकेला आजच्या सभेत राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले. पुन्हा एकदा ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत गंगेतील प्रदुषणाची स्थिती दर्शवली. तसेच, ज्यांना या गोष्टी कळत नाहीत, त्यांनी मला हिंदुत्व शिकवू नयेत, असे म्हणत त्यांनी टीकाकारांवर जोरदार निशाणा साधला.
कुंभमेळा व गंगा नदीच्या प्रदुषणाच्या मुद्यावर राज ठाकरे काय म्हणाले?
सभेत कुंभमेळा व गंगा नदीच्या प्रदुषणाच्या मुद्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, काही हिंदुत्ववाद्यांना वाटलं की मी कुंभमेळ्याचा अपमान केला. आपल्या देशात नद्यांची जी भीषण अवस्था आहे, आपण नद्यांना माता म्हणतो, त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष होत आहे.
गंगा स्वच्छ करावी असे म्हणणारी पहिली व्यक्ती राजीव गांधी होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तेच सांगितले. तेव्हापासून ते आजपर्यंत गंगा स्वच्छ झाली नाही.ज्यांनी त्या ठिकाणी अंघोळ केली त्यामधील अनेकजण आजारी पडले., असे म्हणत त्यांनी यावेळी गंगा नदीतील प्रदुषणाचा व्हिडिओ दाखवला.
ते पुढे म्हणाले की, प्रश्न हा कुंभमेळ्याचा अपमान करण्याचं किंवा गंगेचा अपमान करण्याचं नाही. प्रश्न पिण्याचा पाण्याचा आहे. गंगेच्या शुद्धीकरणावर 33 हजार कोटी खर्च करण्यात आलं आहे. एका महंताला तसंच टाकून देण्यात आलं. अर्धवट प्रेत जाळले जातात आणि तसेच गंगेत टाकले जातात.
हजारो वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. आता परिस्थिती वेगळी आहे. आता एका घाटावर वेगळी जागा येत नाही का? लोक म्हणतात ते ऐकत नाही. दारू प्यायल्यावर पोलीस पकडतात. मग लोक टॅक्सीने जाऊ लागले. लोक सुधारले ना? या नद्या किती गलिच्छ आहेत. नद्या धर्माच्या नावाखाली बरबाद केल्या जात आहेत. प्रत्येकाने आपापल्या धर्मात सुधारणा केल्या पाहिजे, असे ते यावेळी बोलताना म्हणाले.





