Mumbai Local Train Accident | मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या दुर्घटनेमुळे मुंबईकरांच्या जीवघेण्या प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुंबईची लाईफलाइन समजली जाणारी लोकल आता डेथलाइन होत चालली का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मुंब्रा येथील रेल्वे दुर्घटनेनंतर मुंबईसह ठाणे-डोंबिवलीतील नागरिकांमधून रेल्वे प्रशासन व सरकारविरोधात संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील रेल्वे प्रशासनाविरोधात आक्रमक झाली आहे. मनसेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाने आज ठाण्यातील गावदेवी मैदान ते रेल्वे स्टेशनपर्यंत धडक मोर्चा काढला आहे. या मोर्चावेळी मनसेने रेल्वे प्रशासनावरील संताप व्यक्त केला. तसेच मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे बोर्डाची स्थापना करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मोठ्या प्रमाणात सध्या पोलीस बंदोबस्त ठाणे रेल्वे स्थानकात पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबईच्या लोकलमध्ये दररोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करतात. यामध्ये कर्जत, कसारा, पनवेल, डहाणू, उरण अशा लांबच्या भागातून चार-पाच तास प्रवास करणारे नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. दिवसभरात २,३४२ लोकलच्या फेऱ्या होतात. विशेषतः बदलापूर, खोपोली मार्गावर गर्दीमुळे गाडीत चढण्यासाठी मारामारी, चेंगराचेंगरी, धक्काबुक्की हे रोजचेच चित्र आहे. Mumbai Local Train Accident | नेमका कसा घडला अपघात? 9 जून 2025 रोजी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान दोन लोकल गाड्या – एक कसाराकडे जाणारी आणि दुसरी सीएसएमटीकडे जाणारी – एकमेकांच्या अगदी शेजारील ट्रॅकवरून भरधाव वेगाने जात होत्या. दरवाज्याजवळ लटकलेल्या प्रवाशांच्या पाठीवरील बॅगांचा एकमेकांना धक्का बसला, ज्यामुळे तोल जाऊन काही प्रवासी ट्रॅकवर फेकले गेले. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत. दरम्यान, राज्य सरकारने मुंबई लोकल दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. Mumbai Local Train Accident | हेही वाचा: अण्णा हजारे अन् रामदेव बाबा कुठे आहेत? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल; भाजपवर निशाणा साधत म्हणाले” फक्त बोलायचा भात बोलाची कडी”