पिंपरी | विकासाला चालना दिल्याने आमदार लांडगेंना देणार साथ

पिंपरी, (प्रतिनिधी) – मोशी येथील 650 बेडचे हॉस्पिटल, न्यायालय संकुल, अभियांत्रिकी कॉलेज, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, संविधान भवन यासारख्या प्रकल्पांची उभारणी भोसरी मतदारसंघात करून आमदार महेश लांडगे यांनी मोशी सारख्या समाविष्ट गावांमध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू केला आहे.
विशेषतः पिंपरी चिंचवडच्या तुलनेत विकासाच्या प्रवाहात मागे पडलेल्या समाविष्ट गावांना विकासाचा अर्थ सांगणार्या आमदार लांडगे यांच्या पा.िठशी मोशी गाव एकजुटीने उभे राहणार आहे, असा निर्धार माजी उपमहापौर शरद बोर्हाडे यांनी व्यक्त केला.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ मोशी येथील श्री नागेश्वर महाराज मंदिरामध्ये ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये नारळ वाढवून प्रचाराचा ‘श्री गणेशा’ करण्यात आला.
फुलांची उधळण करत फटाक्याच्या आतिशबाजीत आणि रांगोळ्यांच्या पायघड्यांनी आमदार महेश लांडगे यांचे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. मोशी गावठाण, शिवाजीवाडी, हवालदारवस्ती ,सस्तेवाडी, आल्हाटवाडी, लक्ष्मीनगर, कुदळेवस्ती, सस्तेवस्ती येथील नागरिकांचा भेटीगाठी घेण्यात आल्या. यावेळी आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
मोशी परिसराचा लौकिक वाढविला
आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून मोशी कचरा डेपो येेथे वेस्ट टू एनर्जी, बायोमायनिंग, बायोगॅस निर्मिती, सीएन्डडी वेस्ट प्रकल्प कार्यान्व.ियत करण्यात आला. बफर झोनची हद्दी कमी केली. त्यामुळे पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करता आल्या.
यासह आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र, संविधान भवन, पिंपरी-चिंचवड न्यायालय संकूल, आयआयएम कॅम्पस आणि विशेष म्हणजे जगातील सर्वांत उंच छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा ‘स्टॅच्यु ऑफ हिंदुभूषण’ उभारण्यात येत आहे. त्यामुळे मोशी आणि परिसराचा लौकीक वाढला आहे, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.
नागेश्वर महाराजांचा भंडारा आणि विजयाचा संकल्प
मोशी परिसरात आमदार महेश लांडगे यांचा प्रचाराचा प्रारंभ श्री नागेश्वर महाराज मंदिरामध्ये नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने भंडारा उधळला. मोशीतून सर्वाधिक मतदान लांडगे यांना होईल. यादृष्टीने आम्ही काम करीत आहोत, असा संकल्प स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी केला आहे.
आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभेसाठी विविध विकास प्रकल्प या भागात आणले. सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार अतिशय चांगले काम करत आहे.
लाडकी बहीण योजना महिला भगिनींसाठी महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपले सरकार आणण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी आम्ही सर्व एकजुटीने उभे राहणार आहोत. – प्रा. कविता आल्हाट, महिला शहराध्यक्षा, राष्ट्रवादी अजित पवार गट.





