‘लाडक्या बहिणींच्या’ अर्जासाठी आमदार सरसावले

नगर – राज्य सरकारने महिलांना आर्थिक मदत मिळावी व त्यांच्या कुटुंबांना हातभार लागावा, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजना सुरू करून दरमहा दीड हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महिलांना आता कागदपत्र गोळा करून ऑनलाइन फॉर्म भरावा लागणार आहे.
त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या कार्यालयामध्ये फॉर्म भरून ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी मोठी गर्दी पाहिल्यानंतर ते स्वतःच फॉर्म भरण्यासाठी सरसावले व महिलांना मार्गदर्शन केले.
शहरातील महिलांनी लाडकी बहीण योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा यासाठी माझ्या कार्यालयामध्ये मोफत ऑनलाइन अर्ज भरण्याचीसुविधा उपलब्ध करून दिले आहेत. या माध्यमातून महिलांना अधिक अधिक सोयीचे होणार आहे. असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.





