मोठी बातमी ! तब्बल 35 आमदारांच्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान ; धनंजय मुंडे, सुरेश धस यांच्यासह ‘या’ आमदारांचा समावेश

MLAs challenged in High Court । राज्यात प्रचंड बहुमताने महायुती सरकार सत्तेत स्थापन झाले आहे. परंतु, या निवडणुकीत निवडून आलेल्या काही आमदारांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून सत्ताधारी आणि विरोधकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, निवडणूक निकाला विरोधात याचिका दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता. यादिवशी न्यायालयात एक दोन नव्हे तर तब्बल 35 आमदारांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आल्या आहे. या याचिका काही मुंबई उच्च न्यायालय तर काही औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाविकास आघाडीमधील बारा पराभूत उमेदवारांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. सर्वाधिक अहिल्यानगर जिल्ह्यातून आठ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीमधील पराभूत झालेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रशांत जगताप, अजित गव्हाणे, महेश कोठे, नरेश मणेरा, सुनील भुसारा, मनोहर मढवी, राहुल कलाटे, वसंत गीते, संदीप नाईक, रमेश बागवे यांनी उच्च न्यायालयामध्ये निवडणूक निकाल विरोधामध्ये धाव घेतली आहे,
वर्षा गायकवाड यांच्या याचिकेवरील निर्णय राखीव MLAs challenged in High Court ।
दरम्यान, वर्षा गायकवाड यांच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय राखीव ठेवला आहे. मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून गायकवाड यांनी गेल्यावर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती. भाजप उमेदवार वकील उज्ज्वल निकम यांच्याविरुद्धच्या प्रमुख लढतीत गायकवाड यांनी विजय मिळवला होता. निवडणुकीदरम्यान जाहिरातपत्रकांवर (हँडबिल) मुद्रक आणि प्रकाशकांच्या नावांचा समावेश असणे अनिवार्य आहे, परंतु, त्याबाबतच्या निकषांची पूर्तता गायडवाड यांच्याकडून केला गेला नाही, असा दावा करून या मतदारसंघातून निवडणूक लढवलेले उमेदवार आसिफ सिद्दीकी यांनी याचिका दाखल केली आहे.
दुसरीकडे, याचिका अर्थहीन असून आपण नियमांचे उल्लंघन केल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा दावा गायकवाड यांच्यावतीने करण्यात आला आहे. दरम्यान, वर्षा गायकवाड यांच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून गायकवाड यांनी गेल्यावर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याविरुद्धच्या लढतीत गायकवाड यांनी विजय मिळवला होता.
कोणकोणत्या आमदारांविरुद्ध याचिका दाखल? MLAs challenged in High Court ।
संजय शिरसाठ
धनंजय मुंडे
सुरेश धस
हिकमत उढाण
संतोष दानवे
तानाजी सावंत
अर्जुन खोतकर
आमदार रमेश कराड
नमिता मुंदडा
संजय बनसोडे
राजू नवघरे
बाबासाहेब पाटील
मंजुळा गावित
अमोल पाटील





