Nevase News : आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी नव्या न्यायालयीन इमारतीच्या बांधकामाची केली पाहणी
Nevase News : यानंतर त्यांनी न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याने समाधान व्यक्त केले.

नेवासे : नेवासे येथील नवीन न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम सध्या युद्ध पातळीवर सुरु असून या कामाची प्रत्यक्ष पाहणी आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी नुकतीच नेवासे वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत केली. यानंतर त्यांनी न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याने समाधान व्यक्त केले.
यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या समवेत नेवासे सार्वजनिक बांधकाम खात्याचे साहाय्यक अभियंता विनायक पाटील, नागराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले आणि विकील संघाघे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी या न्यायालयाच्याबांधकामाची गुणवत्ता, कामाचा वेग आणि विविध तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेतला.
या नव्या न्यायालयाच्या इमारतीच्या माध्यमातून विकील बांधवांना आणि पक्षकार मंडळींना आधुनिक, सुसज्ज व सक्षम न्यायालयीन सुविधा उपलब्ध होणार असून यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट दर्जाचे, सुरक्षित आणि निर्धारित वेळेत नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी दिल्या.
तसेच या न्यायालयाच्या बांधकामबाबत कोणत्याही प्रकारे गुणवत्तेशी तडजोड न हे करता काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. यानंतर आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांचा विकील संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व विकील संघटनेचे पदाधिकारी आणि वकील बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





