करपलेल्या चपात्या,डाळीमध्ये आळ्या…निकृष्ट भोजनावरून आमदार संतोष बांगर पुन्हा संतप्त

हिंगोली (प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे) – हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्यातील मध्यान्ह भोजन योजनेतील गैरप्रकार उघड केला. मागच्या वेळी सुद्धा आमदार बांगर यांनी गैरप्रकार करणाऱ्या मॅनेजरच्या कानशिलात लगावल्यामुळे मोठा गोंधळ झाला होता तसेच तथाकथित घरात बसून शहाणपणा शिकवणाऱ्यांनी आमदार बांगर यांच्यावर टीका देखील केली होती परंतु सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी, त्यांच्या अधिकारांसाठी नेहमीच आक्रमकपणे भूमिका मांडणारे आमदार संतोष बांगर यांनी कुणाच्याही टीकेला भीक न घालता सर्वसामान्य कष्टकरी मजुरांना दर्जेदार भोजन मिळाले पाहिजे असे ठणकावून सांगितले होते
आज आमदार बांगर यांनी पुन्हा एकदा मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या जेवणाची चौकशी केली असता गाडीतील हेल्पर नी मेनू प्रमाणे जेवण का नाही याबद्दल उडवा उडवीची उत्तरे दिली यावेळी मेनू प्रमाणे जेवणामध्ये गुळ नव्हता, सलाडच्या नावाखाली फक्त गोबी चिरलेली दिसून आली तसेच चपात्या ह्या करपलेल्या होत्या आणि डाळीमध्ये चक्क आळ्या आढळून आल्या. अश्या प्रकारचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न गोरगरीब कष्टकरी मजुरांना देण्यात येत असून संबंधित गैरप्रकार करणाऱ्या व मेनुप्रमाणे जेवण न देता निकृष्ट अन्न देऊन गोरगरीब मजुरांच्या जीवनाशी खेळणाऱ्या मुजोर कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे आमदार बांगर यांनी सांगितले.
जेवनापेक्षा कामगारांच्या खात्यात रक्कम टाका
या सर्व प्रकारानंतर आमदार संतोष बांगर म्हणाले कि दर्जाहीन जेवण देऊन संबंधित कंत्राटदार कामगारांच्या जीवशी खेळत आहेत. या सर्व प्रकारामुळे या पुर्वी देखिल मी एकाच्या कानाखाली मारली होती मात्र तरीही त्याची मनमानी चालूच आहे. कष्टकऱ्याच्या जीवाशी चाललेली हा खेळ थांबवणे गरजेचे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हें कंत्राट रद्द करून थेट कामगारांच्या खात्यात पैसे टाकावे असे बांगर म्हणाले अन्यथा आगामी काळात याऊन तीव्र आवाज उठविलन्याचा ईशारा देखिल त्यांनी यावेळी दिला.





