Ratnakar Gutte : खळबळजनक ! आमदार रत्नाकर गुट्टेंचा नातू पुण्यामधून झाला बेपत्ता

परभणी : राजकीय वर्तृळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू बेपत्ता झाला आहे. तो पुण्यातून बेपत्ता झाला आहे. गुट्टे यांच्या भाचीचा मुलगा सुमित भागवत गुट्टे (वय वर्ष 24) हा एक जानेवारीपासून बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काय घडले नेमके?
ही घटना एक जानेवारी रोजी घडली. ज्यूपीटर हॉस्पीटमध्ये मुलाखतीसाठी जात असल्याचं त्याने सांगितलं त्यानंतर तो घराच्या बाहेर पडला, दोन तासांमध्ये येतो असंही तो म्हणाला होता, मात्र तो घरी परतलाच नाही. सुमित गुट्टेशी शेवटचं फोनवर बोलणं एक जानेवारीला दुपारी तीन वाजून तीन मिनिटांनी झालं होतं, त्यानंतर त्याचा फोन बंद आहे, अशी माहिती रत्नाकर गुट्टे यांनी दिली आहे.
काय म्हणाले रत्नाकर गुट्टे?
याबाबत आमदार रत्नाकर गुट्टे यांना विचारले असता माझा नातू मिसिंग आहे, त्यामुळे मी सध्या वेगळ्याच दु:खात आहे. माझा नातू मिसिंग असल्यामुळे मी परभणीमध्ये झालेल्या आक्रेश मोर्चात देखील सहभागी होऊ शकलो नाही. माझा नातू एक जानेवारीपासून मिसिंग आहे. माझ्या भाचीनं त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फोन बंद आहे. तो एक जानेवारीला सकाळी 9 वाजता घराबाहेर पडला होता.
मी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. एक जानेवारीला दुपारी तीन वाजून तीन मिनिटांनी त्याच्याशी शेवटचं बोलणं झालं होतं. मात्र त्यानंतर तो बेपत्ता झाला, या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.





