MLA PA And Driver Salary Hike : मोठी बातमी..! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या मानधनात मोठी वाढ; १ ऑगस्टपासून नवा दर लागू
MLA PA And Driver Salary Hike : महाराष्ट्र विधानमंडळातील विद्यमान आमदारांच्या स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

MLA PA And Driver Salary Hike : महाराष्ट्र विधानमंडळाच्या विद्यमान सदस्यांच्या स्वीय सहाय्यक (PA) आणि वाहनचालकांच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही वाढ १ ऑगस्ट २०२६ पासून लागू करण्यात आली आहे. (MLA PA And Driver Salary Hike)
नव्या निर्णयानुसार, आमदारांच्या स्वीय सहाय्यकांचे मासिक मानधन ३० हजारांवरून थेट ४० हजार रुपये करण्यात आले आहे. तर वाहनचालकांचे मानधन २० हजारांवरून ३० हजार रुपये करण्यात आले आहे. (MLA PA And Driver Salary Hike)
संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याबाबत माहिती दिली. विधानमंडळ सदस्यांना त्यांचे प्रशासकीय आणि विधिमंडळाचे कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी स्वीय सहाय्यकांची सुविधा दिली जाते. (MLA PA And Driver Salary Hike)
विधिमंडळ सदस्यांच्या वेतन व भत्ते संयुक्त समितीच्या शिफारशीनुसार PA आणि वाहनचालकांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला. (MLA PA And Driver Salary Hike)
नवीन मानधन असे :
स्वीय सहाय्यक (PA): ₹30,000 – ₹40,000
वाहनचालक: ₹20,000 – ₹30,000
वाढ लागू: १ ऑगस्ट २०२६ पासून






