अहमदनगर :कोपरगाव नगरपरिषदेला आमदार काळेंनी दिले आरोग्य साहित्य

कोपरगाव (प्रतिनिधी) –कोपरगाव शहरातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या आरोग्य विभागासाठी आरोग्य साहित्य दिले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या हस्ते मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी हे आरोग्य साहित्य स्वीकारले.
करोनाची साखळी संपुष्टात यावी, यासाठी शुक्रवार (दि.28) पासून 31 ऑगस्टपर्यंत कोपरगाव शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहे. या चार दिवसात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी कोपरगाव नगरपरिषदेला आरोग्य साहित्य देण्यात आले आहे.
यामध्ये 20 पीपीई किट, 100 डिस्पोजेबल कॅप, 100 डिस्पोजेबल ग्लोव्हज, 100 एन 95 मास्क, 100 फेस शिल्ड मास्क आदी साहित्याचा समावेश आहे. यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, गौतम सहकारी बॅंकेचे संचालक सुनील शिलेदार, संजय तिरसे आदी उपस्थित होते.





