“माझ्या मुलांनी माझा अपमान केला” ; स्वाभिमानी पित्याने कोट्यवधींची संपत्तीच केली दान

Donation of crores of wealth। तामिळनाडूतील अरुलमिघु रेणुगाम्बल अम्मान मंदिराच्या मंदिर प्राधिकरणाच्या सदस्यांसाठी दर दोन महिन्यांनी एकदा भाविकांकडून मिळालेल्या देणग्यांची मोजणी करण्याची पारंपारिक पद्धत आहे. त्याचप्रमाणे २४ जून रोजी नियमित तपासणी करण्यात आली. मात्र या तपासणी दरम्यान मंदिरात असलेल्या ११ ‘हुंडी’ पैकी एका ‘हुंडी’ मध्ये ४ कोटी रुपयांच्या दोन मालमत्तेचे कागदपत्रे आढळून आल्याने मंदिर सदस्यांना धक्का बसला. ‘हुंडी’ म्हणजे एक दानपेटी ज्यामध्ये भाविक मंदिरात रोख रक्कम आणि इतर भेटवस्तू ठेवतात.
हे मंदिर तामिळनाडूच्या तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील अरणी शहराजवळ आहे. मालमत्तेची कागदपत्रे दान करणाऱ्या भक्ताची ओळख निवृत्त लष्करी जवान एस विजयन अशी झाली आहे. केशवपुरम गावातील रहिवासी विजयन लहानपणापासूनच मंदिरात पूजा करत आहेत. पत्नी व्ही कस्तुरीशी मतभेद झाल्यानंतर ते सुमारे दहा वर्षांपासून एकटेच राहत आहे.
माझ्या मुलांनी माझा अपमान केला Donation of crores of wealth।
विजयनलाही दोन मुली आहेत. त्या दोघी विवाहित आहेत आणि वेल्लोरमध्ये राहतात. मात्र, त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याची माहिती समोर आली. आणखी तपास केला असता असे आढळून आले की, त्यांच्या मुली मालमत्ता त्यांच्या नावावर करण्यासाठी दबाव आणत होत्या. एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, विजयन यांनी, ‘माझ्या मुलांनीही माझा अपमान केला होता. मी माझ्या शब्दावरून माघार घेणार नाही.’असे म्हटले आहे.
मंदिराच्या अधिकाऱ्याने काय म्हटले? Donation of crores of wealth।
मंदिराचे अधिकारी एम. सिलंबरसन म्हणाले की, अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. त्यांनी सांगितले की दानपेटीत कागदपत्रे ठेवल्याने मंदिर स्वतःच मालमत्तेचे मालक बनते असे नाही. त्यांनी वर्तमानत्राला सांगितले की, मंदिरावर कायदेशीररित्या दावा करण्यासाठी, भक्ताला विभागाकडे देणगीची अधिकृतपणे नोंदणी करावी लागेल. मंदिर अधिकाऱ्यांनी सांगितले की, हुंडीमध्ये सापडलेले दोन मालमत्तेचे कागदपत्रे जमीन आणि मंदिराजवळील एक मजली घराचे आहेत. त्यांनी सांगितले की, सध्या ही कागदपत्रे भक्ताला परत करता येणार नाहीत कारण वरिष्ठ एचआर अँड सीई अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे आणि ते काय करायचे ते ठरवतील. तोपर्यंत विभाग कागदपत्रे सुरक्षित ठेवेल.





