Chhagan Bhujbal: ‘त्या’ कागदावर शरद पवारांनी काय लिहून दिले होते?, छगन भुजबळ म्हणाले…

Chhagan Bhujbal: पुण्यात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर आलेले पाहायला मिळाले. दोघेही नेते एकाच मंचावर आल्याने या भेटीची चांगलीच चर्चा रंगली. यावेळी शरद पवारांनी एका कागदावर लिहून छगन भुजबळांकडे दिला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. आता शरद पवारांनी कागदावर नक्की काय लिहून दिले होते? असा प्रश्न विचारताच छगन भुजबळांनी त्यावर भाष्य करणे टाळले.
पुण्यात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने चाकण बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर सावित्रीबाई फुलेंच्या पुतळा उभारण्यात आला आहे. या कार्यक्रमसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते (अजित पवार) छगन भुजबळ आणि शरद पवार एकाच मंचावर आले होते. भुजबळांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यातच मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळांनी वारंवार नाराज देखील व्यक्त केली आहे. त्यामुळे दोन्ही नेते एकाच मंचावर आल्याने याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली.
यावेळी कार्यक्रमादरम्यान शरद पवारांनी कार्यक्रम पत्रिकेवर काहीतरी लिहून छगन भुजबळांकडे दिले. याबाबत पत्रकार परिषदेमध्ये छगन भुजबळांना प्रश्न विचारला असता ‘त्यावर काय लिहिलं ते सांगू? ते परदे मे रहने दो, पर्दा ना उठाओ ‘ असे बोलत त्यांनी त्या संदेशाबाबत बोलणे टाळले. भुजबळांनी हा विषय टाळल्याने शरद पवारांनी नक्की काय लिहिले होते, याचे गुढ आणखीनच वाढले.
यावेळी त्यांना प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडून तुमची मनधरणी केली जात आहे का? असा प्रश्न देखील विचारला. या प्रश्नार बोलताना ‘माझी कोणाशीही भेट झालेली नाही किंवा चर्चा झालेली नाही. मला यावर काही बोलायचे नाही’, असे ते म्हणाले.





