आमदार बच्चू कडू यांना न्यायालय सुटेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा, 2500 रुपये दंड
Updated On:

धाराशिव – सर्वसामान्यांचा नेता म्हणून परिचित असलेल्या माजी राज्यमंत्री, आमदार बच्चू कडू यांना एका प्रकरणात न्यायालय सुटेपर्यत बसुन रापण्याची शिक्षा सुनावण्यिात आली आहे. 2015मध्ये शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी त्यांच्यासह इतर तीन जणांच्या विरोधात धाराशिव शहरात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
या प्रकरणी आज धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी 506 नुसार बच्चू कडू यांना दोषी धरत न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत बसुन राहणे व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणातील इतर तिघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
टॅग्स:





