पुणे जिल्हा | आमदार अतुल बेनके बनले राखीमॅन

नारायणगाव (वार्ताहर) – शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने 15 हजारांपेक्षा अधिक महिलांनी राखी बांधून सण साजरा केला.
14 नंबर येथील ब्लुमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसादत दिसून आला. गेल्या अनेक वर्षांपासून बेनके कुटुंबाची रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्याची परंपरा आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी बांधून रक्षाबंधन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना आमदार बेनके यांनी रक्षाबंधनाची सांस्कृतिक परंपरा जपत एक चांगला सामाजिक आदर्श निर्माण केला आहे.
तालुक्यातील महिला भगिनींचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधण्याचे उत्तम व्यासपीठ आमदार अतुल बेनके यांनी उपलब्ध करून दिले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिपादन केले होते.
तर दिवसभरात तालुक्यातील भगिनींनी रक्षाबंधन सोहळा अविस्मरणीय केला असून रेशमी क्षणांची भावना मला शब्दांत व्यक्त करता येत नाही.
तुम्हां सर्वांच्या प्रेमाची आणि विश्वासाची कायम जाण ठेवून, उत्साहाने, जबाबदारीने आणि आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मला मिळाली. हा रेशमी ऋणानुबंध आयुष्यभर अतूट राहील हा भाऊ तुमच्या प्रत्येक सुख दुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहील याची खात्री देतो.
या पवित्र सणाच्या निमित्ताने माझ्या सर्व भगिनींना मी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो अशी भावना यावेळी आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केली.





