पिंपरी | आमदार अमित गोरखेंची मैत्रीदिनी गीत गायनातून साद

पिंपरी, (प्रतिनिधी) – आमदार अमित गोरखे यांनी मैत्रीदिनी आपल्यातील गायनाची कला दाखवून दिली. काही जीवलग मित्रांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी मित्रांसाठी सोचेंगे तुम्हे प्यार करेके नही हे गीत सादर करून कौतुकाची थाप पटकाविली. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा राजकारणाच्या पलीकडचा आणखी एक अनोखा पैलू यानिमित्ताने समोर आला आहे.
काही दिवसांपूर्वी अमित गोरखे यांची विधान परिषदे सदस्यपदी निवड झाल्याने ते प्रकाशझोतात आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकवर्तीय असलेले गोरखे यांचे बालपण चिंचवडमधील काळभोरनगर परिसरात गेले आहे. या परिसरातील काही मिंत्रांच्या वाढदिवसानिमित्त गोरखे व त्यांचे मित्र एकत्र जमले होते.
आखड व मैत्रीदिनाचे औचित्य साधून जमलेल्या मित्रांकडून अमदार गोरखे यांना गाणे सादर करण्याची फर्माइश करण्यात आली. मित्रांच्या विनंतीला मान देत गोरखे यांनीदेखील फारशे आढेवेढ न घेता कॅराओकेच्या माध्यमातूऩ दिवाना या हिंदी चित्रटातील सोचेंगे तुम्हे प्यार करेके नही हे गीत सादर केले. त्यांचा हा अनोखा अंदाज पाहून उपस्थित मित्रांनादेखील आपल्या आमदार मित्राचे कौतुक करण्याचा मोह आवरला नाही.





