MJ Special : एक होता ‘मायकल जॅक्सन’, जाणून घ्या ‘किंग ऑफ पॉप’च्या जीवनाशी संबंधित ‘हे’ मनोरंजक तथ्ये…

मुंबई – “मायकल जॅक्सन” हे एक असं व्यक्तिमत्व आहे ज्याला कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही. त्याच्याबद्दल माहिती नाही असा मनुष्य शोधून देखील सापडायचा नाही, पॉप संगीताला विश्वपटलावर उच्च स्थानी पोहोचविण्यात मायकल जॅक्सन याचा खूप मोठा वाटा आहे.

जरी आज मायकल आज आपल्यात नसला तरी त्याच्या कारकीर्दीमुळे तो अमर झाला आहे. पिढ्यान् पिढ्या त्याचे स्मरण होताच राहील. अगदी लहानग्या वयात संगीताच्या जगात पाऊल ठेवणाऱ्या मायकलचा “किंग ऑफ पॉप..’ होईपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. 

याच ‘किंग ऑफ पॉप..’ ची आज (दि. 29) जयंती आहे… जेव्हा मायकलचा एरा आला, तेव्हा त्याने सर्वांना मागे सोडले. आणि आपली जादू सर्वत्र प्रस्थापित केली. आज त्याच्या  पुण्यतिथीनिमित्त मायकल जॅक्सनच्या जीवनाशी संबंधित काही उत्तम रंजक गोष्टी जाणून घेऊया…

1) 29 ऑगस्ट 1958 ला शिकागो नजीक एका लहानश्या गावात ‘मायकल’चा जन्म झाला.आपल्या माता-पित्याचे तो सर्वात लहान अपत्य होता.

2) मायकेल जॅक्सनचा अल्बम “थ्रिलर’ हा आतापर्यंतचा सर्वाधिक विक्री होणारा अल्बम आहे. या मधील सर्वच गाणे लोकप्रिय झाले आहेत.

3) मायकल जॅक्सन आणि वादांचे नाते तसे चर्चित होते. लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांचा त्याने अनेक वेळा सामना केला असून, तो दोन दिवस तुरूंगातही होता. 2002 मध्ये मुलाला बाल्कनीच्या बाहेर लटकवल्यामुळे अभिनेता चर्चेत आला होता.

4) मायकल जॅक्सन जिवंत राहण्यासाठी देखील ऑक्सिजन चेंबरमध्ये झोपायचा. त्याचा असा विश्वास होता की, असे केल्याने आपले शरीर चांगले आयुष्य जगते आणि आपण अधिक आयुष्य जगू शकतो.

5) एचआयव्ही / एड्सच्या विविध रुग्णांना मदत करण्याच्या महत्त्वपूर्ण कार्यामुळे जॅक्सन यांना माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी मानवतावादी पुरस्कार जाहीर केला.

6) मायकल जॅक्सन ने 18 मे 1995 ला वयाच्या 35 व्या वर्षी लिसा प्रेस्ली शी विवाह केला, मात्र त्याचा हा विवाह फार काळ टिकला नाही. 18 जून 1996 ला दोघांचा काडीमोड झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.