मिझोरममध्ये दगड खाण कोसळून 17 जणांचा मृत्यू
Updated On:

आइजोल – मिझोरममध्ये मुसळधार पावसामुळे दगड खाण कोसळून १७ जण मृत्युमुखी पडले. त्या दुर्घटनेनंतर काही जण बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आइजोल शहरालगत असणारी दगड खाण मंगळवारी सकाळी कोसळली. त्यानंतर तातडीने बचाव कार्य हाती घेण्यात आले. मात्र, पावसाचा जोर अधिक असल्याने त्या कार्यात अडथळे येत होते.
मृतांमध्ये २ बालकांचाही समावेश असल्याचे समजते. राज्य सरकारने दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी ४ लाख रूपयांची मदत जाहीर केली. रेमल वादळाच्या प्रभावामुळे मिझोरमला पावसाने तडाखा दिला. त्यामुळे त्या राज्यात विविध ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. त्यामध्येही काही जण दगावल्याची प्राथमिक माहिती आहे.





