अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी मिटकरींचे पांडुरंगाला साकडं; म्हणाले “पुढच्या आषाढी एकादशीची…”

Ajit Pawar | राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबची इच्छा बोलावून दाखवली आहे. इतकेच काय तर विठ्ठलाकडे अजितदादांना लवकरच राज्याचे मुख्यमंत्री करण्याचे साकडं घातल आहे, असेही माध्यामांसोबत बोलताना मिटकरी याणी सांगितले आहे.
अमोल मिटकरी यांच्या अकोल्यातील आरोग्यनगर भागातील निवासस्थानी रूपनाथ महाराजांची पालखी आली होती. यावेळी अमोल मिटकरी यांनी रूपनाथ महाराजांच्या पालखीचे सहपरिवार स्वागत केलं. अमोल मिटकरी म्हणाले की, आज पालखीचे प्रस्थान होत आहे. ज्ञानोबारायांची पालखी आळंदीवरून निघाली आहे. काल तुकोबारायांची पालखी निघाली. आता आमच्या जिल्ह्यातील पालखी निघत आहेत.”
“या पालखीची आरती करताना आम्ही एकच साकडे घातले की, यावर्षी पांडुरंगाच्या मनात नसेल. पण पुढच्या आषाढी एकादशीची शासकीय महापूजा ही राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून सपत्नीक करावी, हे साकडे मी पांडुरंगाला घातले आहे,” असे मिटकरी यांनी म्हटले. दरम्यान, मागील वर्षी देखील अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत इच्छा बोलून दाखवली होती. Ajit Pawar |
सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
तर काल अजित पवार यांच्या पत्नी तथा खासदार सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर भाष्य केलं होते. ‘तुम्ही देखील पांडुरंगाची पूजा लवकरच करावी आणि अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी तुमची इच्छा आहे का? ‘असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी केला. यावर “आपण नेहमी चांगल्या इच्छा अपेक्षा व्यक्त करत असतो. पण शेवटी काय द्यायचं काय द्यायचं नाही हे देवाच्या हातात असतं. तेव्हा पांडुरंग नक्कीच सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील,” असे उत्तर सुनेत्रा पवार यांनी दिले. Ajit Pawar |
अजित पवारांनीही मुख्यमंत्रीपदाबाबत बोलून दाखवली इच्छा
दरम्यान, अजित पवार आतापर्यंत अनेकवेळा उपमुख्यंत्रिपदी बसलेले आहेत. मात्र त्यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मात्र अद्याप मिळालेली नाही. मुंबईतील कार्यक्रमात मात्र त्यांनी मुख्यमंत्रिपदाची थेट इच्छा व्यक्त केली होती. “राही भिडे म्हणाल्या की भविष्यात या महाराष्ट्रात एखादी महिला मुख्यमंत्री झाली पाहिजे. आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं. पण शेवटी तो योग जुळून यावा लागतो. कारण मलाही गेल्या अनेक वर्षांपासून वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं. पण कुठे जमतंय?,” असं अजित पावर म्हणाले होते. Ajit Pawar |
हेही वाचा:





