पुणे | एमआयटी युनिव्हर्सिटीचा शुक्रवारी दीक्षांत सोहळा

पुणे {प्रभात वृत्तसेवा} – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा सहावा दीक्षांत समारंभ येत्या शुक्रवारी (दि. १९) दुपारी ४ वाजता विश्व सभामंडप, वर्ल्ड पीस डोम येथे आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठातर्फे या वर्षी ५,३६९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत.
त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रात आयुष्यभर केलेल्या अतुलनीय कार्य केल्याबद्दल भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. कृष्णस्वामी विजय राघवन यांना एमआयटी डब्ल्यूपीयू विज्ञान महर्षी सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे.
या वेळी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, विश्वस्त प्रा. पी. बी. जोशी,
कार्याध्यक्ष राहुल कराड, डॉ. मंगेश कराड व कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी अभिजीत पवार याला फाउंडर प्रेसिडेंट मेडल व अनुश्री कुलकर्णी हिला एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट मेडलने गौरविण्यात येणार आहे.




