uttar pradesh rain: उत्तर प्रदेशात पावसाचा धुमाकूळ; गेल्या 24 तासात पावसामुळे 11 जणांचा मृत्यू
Updated On:

uttar pradesh rain – उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासांच्या कालावधीत पावसाशी विविध घटनांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यात गाझीपूर येथे वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत विभागाकडून देण्यात आली.
उत्तर प्रदेशात २४ तासांच्या कालावधीत सरासरी ७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत 75 जिल्ह्यांपैकी 19 जिल्ह्यांमध्ये जास्त पावसाची नोंद झाली असून, हमीरपूरमध्ये सर्वाधिक 163.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गोरखपूर, सिद्धार्थ नगर आणि गोंडा जिल्ह्यांतील नद्या धोक्याच्या पातळीच्या जवळून वाहत असलेल्या स्थानिक प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.





