देशातील कोरोना हाॅटस्पाॅट असलेल्या धारावीत अचानक रुग्णवाढीचा वेग कसा मंदवला?

Updated On:

आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी अशी धारावीची ओळख आहे.  याच धारावीत काही महिन्यांपुर्वी कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराने शिरकाव केला होता.  दोन किलोमीटर अंतरावर किमान अडिच लाख लोक राहतात. त्यामुळे या झोपडपट्टीतील संसर्ग रोखणे,  हे प्रशासन आणि आरोग्या विभागासमोर आव्हान होतं. रोज नव्याने रुग्ण आढळत असताना अचानक काहीच महिन्यात रुग्ण वाढीचा वेग मंदावला. आता धारावी पॅटर्नची देशातच नाही तर जगात चर्चा सुरु आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा धारावी पॅटर्नचं कौतुक केलं आहे.

धारावीतील परिस्थिती-

धारावी ही जगप्रसिद्ध आहे. येथील लोकसंख्या आणि दाटीवाटीमुळे येथे कायम गर्दी असते. दहा बाय दहाच्या खोलीच किमात 15 माणसं राहतात. वाहती उघडी गटारे, गल्ली बोळ, सार्वजनिक शौचालयं, काही तास उपलब्ध असणारं पाणी, निकृष्ठ दर्जाचं जीवणसरणी त्यामुळे कोणत्याही आजाराला घारावी सहज आमंत्रण देते. येथील अनेक माणसांचे हातावर पोट आहे. मजुर काम करणारे आणि परराज्यातून कामासाठी मुंबईत आलेल्यांच्या संख्येचं प्रमाण जास्त आहे.

पहिला रुग्ण ते कोरोनामुक्तीकडे वाटचाल-

एप्रिलमध्ये घारावीत पहिल्या रुग्णाची नोंद झाली होती आणि त्यानंतर आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन कामाला लागलं. एप्रिल- मे महिन्यात रोज 80, 90 तर कधी 100 रुग्ण दिवसाला सापडत होते. मात्र काॅन्टॅक्ट ट्रेसिंग, वेळीच अलगिकरण आणि विविध उपाययोजना राबवल्यानंतर आता धारावीत कोरोना रुग्णांची संख्या रोज एक आकडी बघायला मिळत आहे.

काॅन्टॅक्ट ट्रेसिंग आणि मिशन धारावी-

काॅन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची नोंद करणे आणि त्यावर उपाययोजना राबवणे. मात्र धारावीत काॅन्टॅक्ट ट्रेसिंग सोबतच घरोघरी जाऊन कोरोना टेस्ट करण्यात आल्या आणि त्यांच्यावर वेळेवर उपचार, आलगिकरणसुद्धा करण्यात आले. अजुनही अनेक लोक अलगिकरणात आहे. त्याचसोबत डाॅक्टर आणि त्यांच्या सहकार्यांनी रॅपीड टेस्ट केल्या. प्रत्येकाला अनेक आवाहनही केली. रोज अनेकांना स्वच्छतेचं आजाराचं गांर्भिर्य पटवून देण्यात आता डाॅक्टरांना यश आलं आहे. डाॅक्टरांच्या अनेक तुकड्या करण्यात आल्या होत्या त्यात काही डाॅक्टर्स आणि सहकारी असायचे. रोज नवं मिशन पुर्ण करण्याचं आव्हान प्रत्येक तुकडीकडे होतं.

याच तुकडीत कार्यरत असणारे डाॅ. विरेंद्र मोहिते सांगतात ‘ धारावीत कोरोनाला अटकाव घालणं आमच्यासाठी प्रचंड मोठं आव्हानं होतं. रोज अनेकांचं स्क्रिनिंग करणं, त्यांना समजवं, साथीचंं गांभिर्य लक्षात आणून देणं, लक्षण सांगण हे आमचं रोजचं काम झालं होतं. धारावीकरांनीसुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं.त्यामुळे रुग्ण वाढीचा दर आता 1.9 टक्के एवढाच राहिला आहे. 43 दिवसांचा रुग्ण दुपटीचा वेग 80दिवसांवर गेला  आहे.

 

 

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Jayant Patil : आता आपोआपच लॉकडाऊन होईल; जयंत पाटलांची सरकारवर टीका

2026-05-17 19:03:58

Jayant Patil : आता आपोआपच लॉकडाऊन होईल; जयंत पाटलांची सरकारवर टीका

Sanjay Raut : उद्धव ठाकरेंमुळे एकनाथ शिंदेंचा जीव वाचला; संजय राऊतांनी लगावला टोला

2026-05-02 18:27:43

Sanjay Raut : उद्धव ठाकरेंमुळे एकनाथ शिंदेंचा जीव वाचला; संजय राऊतांनी लगावला टोला

Covid 19: कोरोनाचा नवा व्हेरियंट 23 देशांत पसरला; जगभरात आरोग्याबाबत चिंता वाढली

2026-03-26 18:53:45

Covid 19: कोरोनाचा नवा व्हेरियंट 23 देशांत पसरला; जगभरात आरोग्याबाबत चिंता वाढली

Rahul Gandhi : "मोदींना करोना काळातील दु:खद घटनांचा विसर पडला..."; राहुल गांधींची खोचक टीका

2026-03-24 19:57:24

Rahul Gandhi : "मोदींना करोना काळातील दु:खद घटनांचा विसर पडला..."; राहुल गांधींची खोचक टीका

Narendra Modi : कोरोनाप्रमाणेच पश्चिम आशिया संकटावरही मात करू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

2026-03-23 18:51:14

Narendra Modi : कोरोनाप्रमाणेच पश्चिम आशिया संकटावरही मात करू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास