आता काय म्हणावं सरकारला ! चक्क जाहिरातीवर छापला; 3 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या वृद्धाचा फोटो

रांजणगाव गणपती ( वार्ताहर) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध योजनांचा धुमधडाकास लावला आहे. या योजनांवरती सोशल मीडिया वरती रिल्स बनवत आहेत. तर कोणी आणखी योजनांची मागणी करत आहे या योजना सादर करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरात जाहिरातबाजी केली आहे. यातील जेष्ठांना घडवणार धार्मिक स्थळांचे दर्शन या जाहिरातीमध्ये वरुडे तालुका शिरूर येथील ज्ञानेश्वर विष्णु तांबे यांचा या जाहिरातीमध्ये फोटो झळकला आहे.
विशेष म्हणजे ज्ञानेश्वर तांबे हे गेले तीन-चार वर्षापासून बेपत्ता होते. मात्र ही जाहिरात झळकताच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले कारण आपले वडील सापडले आहेत हे पाहून त्यांच्या मुलाने आनंद व्यक्त केला व वडिलांचा हा फोटो कुठे मिळाला याची त्यांनी शहानिशा सुरू केली याबाबत त्यांनी आमदार अशोक पवार तसेच मुख्यमंत्री कक्षाशी संपर्क साधून हा फोटो कुठे मिळाला याची चाचपणी केली असता आपले वडील पंढरपूर मध्ये असल्याचे त्यांना समजले. असता भरत तांबे हे वडिलांना आणण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने गेले आहेत.





