मिस युनिव्हर्स रिया सिंघा सीतेच्या भूमिकेत; फिल्मी रामलीलाच्या शोजला 3 ऑक्टोबरपासून सुरूवात

नवी दिल्ली : 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान फिल्मी रामलीला होणार आहे. यावेळी रामलीला चित्रपटात मिस युनिव्हर्स इंडिया 2024 रिया सिंघा माता सीतेची भूमिका साकारणार आहे. तर खासदार मनोज तिवारी बालीच्या भूमिकेत तर खासदार रवी किशन सुग्रीवच्या भूमिकेत दिसणार आहेत. मागील वर्षी रामलीला हा चित्रपट ३६ कोटी लोकांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पाहिला होता. यावेळी हा आकडा 50 कोटींवर जाण्याची शक्यता आहे.
फिल्मी रामलीलाचे अध्यक्ष सुभाष मलिक (बॉबी) आणि दिग्दर्शक शुभम मलिक यांनी संयुक्तपणे सांगितले की, यावेळी आम्ही काही बदल करत आहोत. मिस युनिव्हर्स इंडिया 2024 रिया सिंघा अयोध्येतील जगातील सर्वात मोठ्या रामलीलामध्ये सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. मिस युनिव्हर्स इंडिया सीतेची भूमिका साकारण्याची ही पहिलीच वेळ असेल.
रिया म्हणते की, हे वर्ष माझ्यासाठी अनेक अर्थांनी खास आहे. भगवान श्रीरामांच्या आशीर्वादाने मला अयोध्येतील जगातील सर्वात मोठ्या रामलीलेत सीतेची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. हा अनुभव खूपच थरारक आहे. सुभाष मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलीलामध्ये यावेळी एकूण 42 चित्रपट कलाकार वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. याशिवाय अयोध्येतील 20 कलाकार वेगवेगळ्या भूमिकांमध्ये रामकथा जिवंत करताना दिसणार आहेत.





