बहुचर्चित मिर्झापूर – 3 चा ट्रेलर रिलीज; पाहून अंगावर येईल काटा

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते ‘मिर्झापूर 3’ या बहुप्रतिक्षित वेबसीरीजची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. मिर्झापूर आणि ‘मिर्झापूर 2’ या दोन्हीही सीरीजला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला ‘मिर्झापूर 3’ सीरीज येणार आहे. नुकताच या सीरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. सध्या या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते या सिरीजची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.
काय आहे ट्रेलरमध्ये?
मिर्झापूर 2 च्या शेवटी आपण पहिले कि, कालीन भैय्या गायब झालेले आहेत. त्यामुळे मिर्झापूरमध्ये गुड्डू पंडीत राज्य करायला सज्ज होताना दिसत आहे. त्याच्यासोबत गोलूही दिसतोय. लक्षवेधी संवाद, धडाकेबाज ॲक्शन सीन्स आणि सत्तेसाठी मनात असलेली हव्यास आपल्याला ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, ट्रेलरच्या शेवटी पंकज त्रिपाठींची म्हणजेच कालीन भैय्याची एन्ट्री होताना दिसत आहे.
‘हे’ कलाकार दिसणार महत्वाच्या भूमिकेत
‘मिर्झापूर 3’ सीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत पंकज त्रिपाठीसह अली फजल, श्रिया पिळगावकर, श्वेता त्रिपाठी, रसिका डुगल, विजय वर्मा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी ‘मिर्झापूर 3 ‘ची निर्मिती केली आहे. तसेच गुरमीत सिंह आणि आनंद अय्यर यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. ही वेब सिरीज ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर 5 जुलै 2024 ला रिलीज होणार आहे.





