Miraj Panchayat Samiti : मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या राणी भोरे तर उपसभापतीपदी शिंदेंच्या शिवसेनेच्या ललिता शेजुळ
मिरज पंचायत समितीच्या (Miraj Panchayat Samiti) निवडीमध्ये भाजपच्या कवलापूरच्या सदस्य राणी भोरे यांची सभापतिपदी तर शिंदेंच्या शिवसेनेच्या ललिता शेजुळ यांची उपसभापतिपदी निवड करण्यात आली आहे.

Miraj Panchayat Samiti : मिरज पंचायत समितीच्या (Miraj Panchayat Samiti) निवडीमध्ये भाजपच्या कवलापूरच्या सदस्य राणी भोरे यांची सभापतिपदी तर शिंदेंच्या शिवसेनेच्या ललिता शेजुळ यांची उपसभापतिपदी निवड करण्यात आली आहे.
पक्षीय बलाबलानुसार 22 पैकी 14 सदस्य यावेळी उपस्थित होते. तर महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे मिरज पंचायत समितीमध्ये सत्तांतर झाले असून या ठिकाणी आता महायुतीची सत्ता आली आहे.
मिरज पंचायत समितीमध्ये (Miraj Panchayat Samiti) महाविकास आघाडीची सत्ता होती. परंतु, भाजपच्या राणी मोरे यांनी सभापती उपसभापती निवडणुकीबाबत विभागीय आयुक्तांकडे तक्रारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या सदस्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार तन्वी कमलेकर यांना सभापती तर ललिता शेजुळ यांना उपसभापती पदावर निवडून आणले होते.
त्यातच विभागीय आयुक्तांच्या निकालात मिरज पंचायत समिती (Miraj Panchayat Samiti) सभापती व उपसभापती निवड रद्द केली होती. प्रशासनाने पुन्हा फेरनिवड घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मंगळवारी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे गेलेले शिंदे सेनेतील सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील सदस्यांनी महायुतीकडे परती केली तर महाविकास आघाडीचा पराभव करत मिरज पंचायत समितीत आता महायुतीची सत्ता आणली आहे. त्यामुळे भाजपच्या राणी भोरे या सभापती तर शिंदे यांच्या शिवसेनेच्या ललिता शेजुळ या उपसभापतीपदी बिनविरोध निवडून आल्या आहेत.
बिनविरोध निवडून येताच आमदार सुरेश खाडे, माजी खा. संजय पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे निशिकांत पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख बजरंग पाटील यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा सत्कार केला. संजय पाटील यांनी खा. विशाल पाटील यांचे नाव न घेता तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीकेची झोड उठवली.






