Miraj News : मिरजेत भरदिवसा धारदार शस्त्राने वार करून 52 वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून
मिरज शहरात (Miraj News) भरदिवसा गजबजलेल्या गुरुवार पेठेतील शेतकरी चौक परिसरात इलाही लालसाब शेख (वय ५२, रा. डोणगे गल्ली, मिरज) यांची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला.

Miraj News : मिरज शहरात (Miraj News) भरदिवसा गजबजलेल्या गुरुवार पेठेतील शेतकरी चौक परिसरात इलाही लालसाब शेख (वय ५२, रा. डोणगे गल्ली, मिरज) यांची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला.शहरातील वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे मिरज शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इलाही लालसाब शेख मोटारसायकलवरून जात असताना (Miraj News) गुरुवार पेठेतील शेतकरी चौक परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या शरीरावर गंभीर वार करण्यात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
भरदिवसा आणि गजबजलेल्या बाजारपेठेच्या परिसरात हा हल्ला झाल्याने घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती. घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची (Miraj News) पाहणी करून मृतदेह विच्छेदन करण्यासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाची कार्यवाही सुरू केली आहे.






