Miraj News : साडूच्या खुनानंतर संशयित आरोपीची आत्महत्या; दुहेरी मृत्यूने मिरज हादरलं
मिरज तालुक्यातील बेळंकी येथे पैशांच्या वादातून घडलेल्या दुहेरी शोकांतिकेने संपूर्ण परिसर हादरला. आधी कामाच्या पैशांच्या हिशोबावरुन बेदम मारहाण करुन साडूचा खून (Miraj News) करण्यात आला.

Miraj News : मिरज तालुक्यातील बेळंकी येथे पैशांच्या वादातून घडलेल्या दुहेरी शोकांतिकेने संपूर्ण परिसर हादरला. आधी कामाच्या पैशांच्या हिशोबावरुन बेदम मारहाण करुन साडूचा खून (Miraj News) करण्यात आला. नंतर पोलिसांचा शोध सुरु असतानाच या खून प्रकरणातील संशयिताने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.
बेळंकी येथील लिमये मळा परिसरात ही धक्कादायक घटना घडली. बबलू भगवती आणि महेशकुमार ब्रिजलाल गौतम हे दोघे साडूबंधू होते. मूळ गावी जाण्यासाठी कामाचा हिशोब करून पैसे देण्याच्या मागणीवरुन दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.
यावेळी (Miraj News) संशयित दिनेश मोहन आणि मूलचंद बल्ली गौतम यांनीही बबलू भगवती याच्यासोबत मिळून महेशकुमार गौतम यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने महेशकुमार गौतम यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मिरजचे पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांकडून पंचनामा करुन तपास सुरू करण्यात आला. खुनाच्या घटनेनंतर पसार झालेल्या संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली. मात्र, मुख्य संशयित बबलू भगवती याने जवळच असलेल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या (Miraj News) केली. या प्रकरणातील अन्य संशयितांचा शोध सुरु आहे. मिरज ग्रामीण पोलीस दोन्ही घटनांचा तपास करीत आहेत.






