Mira Bhayandar Fire : मुंबईतील मिरा-भाईंदरमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. इंद्रलोक लोधा कॉम्प्लेक्सच्या मागील मोकळ्या जागेत असलेल्या झोपड्यांना शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास आग लागली. या दुर्दैवी घटनेत 50 हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या असून, अनेक जण जखमी झाले आहेत. तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला, मात्र तोपर्यंत बरच नुकसान झालं होतं. अखेरी अथक प्रयत्नांनंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळालं. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. Mira Bhayandar Fire 3 जणांचा होरपळून मृत्यू या आगीत उत्तर प्रदेशचे गुड्डू राम (वय 46) आणि पश्चिम बंगालचे सुरज लियाकत अली मंडळ (वय 14),रोहित रहेमत अली मंडळ (वय15) असे दोन अल्पवयीन मुलांचा मिळून एकूण 3 जणांचा होरपळून मृत्यू झाला. 24 बेकायदेशीर गॅस सिलेंडरचा साठा दरम्यान ही आग विझवल्यानंतर समोर आलेले दृश्य पाहून सगळेच चक्रावले. कारण ज्या झोपडपट्टीमध्ये आग लागली होती, त्या परिसरात तपासादरम्यान 24 बेकायदेशीर गॅस सिलेंडरचा साठा सापडल्याने खळबळ उडाली. त्यामुळे आगीची तीव्रता अधिक वाढल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, एकीकडे देशात गॅसचा तुटवडा असताना झोपडपट्टीत इतका साठा आल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे. हेही वाचा: RTE Admission 2026 : आरटीई प्रवेशाची पहिली निवड यादी जाहीर; १ लाख बालकांचे शैक्षणिक स्वप्न होणार साकार