Mumbai Crime : मुंबईत अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून निघृण हत्या

मुंबई : नवी मुंबईत एका बारा वर्षीय मुलीची निघृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि. २६) तुर्भे परिसरात घडली आहे. या प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी एका सतरा वार्षीय युवकला ताब्यात घेतले असून त्याने गुन्हा कबूल केला आहे.
तुर्भे इंदिरा नगर येथील एक बारा वर्षीय मुलगी हरवली असल्याची तक्रार तिच्या पालकांनी तुर्भे एमआय डीसी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मुलगी अल्पवयीन असल्याने अपहरण झाल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता. साधारणा अकराच्या सुमारास अपहरण झालेली युवती जखमी अवस्थेत आढळली. तातडीने तिला उपचारासाठी डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते.
दरम्यान, या घटनेची माहिती तिच्या एका नातेवाईकाने पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या युवकला ताब्यात घेत चौकशी केली असता किरकोळ वादातून झटापट झाली. त्यातच ती पडली असता तिच्या डोक्यात दगड घातल्याची कबुली मुलाने दिली.




