कोची – दाक्षिणात्य अभिनेते हरीश पेंगन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 49 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गंभीर आजारामुळे त्यांनी मंगळवारी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.
हरीश पेंगन गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराचा सामना करत होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आहे. यकृताच्या समस्येशिवाय त्यांना आणखी काही गंभीर समस्या होत्या.
हरीश पेंगन यांना मे महिन्याच्या सुरुवातीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या. प्रकृती गंभीर असल्याने यकृत ट्रान्सफर करणे गरजेचे होते. पण यासाठी त्यांना 30 लाख रुपयांची गरज होती. त्यामुळे त्यांच्या बहिणीने पैसे गोळा करण्यास सुरुवात केली होती. पण त्याची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
हरीश पेंगन यांच्या निधनानंतर चाहत्यांसह सेलिब्रिटीदेखील शोक व्यक्त करत आहेत. अभिनेता टोविनो थॉमसने सोशल मीडियावर हरीश पेंगन यांचा एक फोटो शेअर करत शोक व्यक्त केला आहे. तसेच केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीदेखील श्रद्धांजली वाहिली.